‘अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ आज ‘इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान

By Admin | Updated: June 3, 2016 02:52 IST2016-06-03T02:52:29+5:302016-06-03T02:52:29+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, ३ जून रोजी ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत ‘भारत अ‍ॅन्ड पाकिस्तान :

'A Dialogue Without Borders' Today 'India and Pakistan' | ‘अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ आज ‘इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान

‘अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ आज ‘इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, ३ जून रोजी ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत ‘भारत अ‍ॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे सायंकाळी ४ वाजता हे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान चालणाऱ्या शांती प्रक्रियेला वैचारिक बळ प्रदान करण्यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित हे मुख्य वक्ता असतील.
याशिवाय थायलंड, म्यानमार व अफगाणिस्तान येथील भारताचे माजी राजदूत विवेक काटजू, भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी व काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी आपले मत व्यक्त करतील.
यावेळी प्रेक्षकांसोबत या दिग्गजांचे प्रश्नोत्तराचे सत्र होईल. या कार्यक्रमासंदर्भात नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. भारत-पाकिस्तानच्या वर्तमान संबंधांबाबत नागरिकांना ऐकायचे व समजून घ्यायचे आहे. ६९ वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या भारत-पाक या दोन भावांनी एकमेकांशी प्रेमाने राहावे, असे दोन्ही देशातील लोकांना वाटते. त्यामुळेच या दोन्ही देशात सुरू असलेल्या शांती प्रक्रियेवर जनतेचे बारीक लक्ष असते. त्याच पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र होत असल्यामुळे नागरिकांना याची उत्सुकता लागली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की, सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी कार्यक्रमाला सोबत येताना आपले व्यक्तिगत ओळखपत्र आणावे.

Web Title: 'A Dialogue Without Borders' Today 'India and Pakistan'