धीरज पांडेय यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:08 IST2021-05-07T04:08:51+5:302021-05-07T04:08:51+5:30

नागपूर : शहर युवक काॅंंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष धीरज पांडेय (वय ३४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काॅंंग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय ...

Dheeraj Pandey passes away | धीरज पांडेय यांचे निधन

धीरज पांडेय यांचे निधन

नागपूर : शहर युवक काॅंंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष धीरज पांडेय (वय ३४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काॅंंग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णकुमार पांडेय यांचे ते पुत्र हाेत.

हेमराज वासनिक

बुद्धिस्ट गोसपेल मिशन ऑफ इंडियाचे संस्थापक हेमराज वासनिक (रा. भंडार माेहल्ला, इंदाेरा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गजानन राजूरकर

गजानन कृष्णराव राजूरकर (रा. अध्यापकनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

नंदकिशाेर शर्मा

दाधीच समाजाचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर हनुमानमल शर्मा (६३, रा. सेंट्रल एव्हेन्यू) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी व दाेन मुले आहेत.

पंजाबराव लाेखंडे

पंजाबराव लोखंडे (वय ७६, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विश्वेश्वरराव राऊत

ह.भ.प. विश्वेश्वरराव राऊत महाराज (वय ८६, रा गाडगे बाबानगर) यांचे निधन झाले. काँग्रेसचे शहर महासचिव परमेश्वर राऊत यांचे ते वडील हाेत. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.

विजया माेहरीर

विजया पुरुषोत्तम मोहरीर (वय ८६, रा. बेलतराेडी) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वामनराव वाघमारे

वामनराव जगन्नाथ वाघमारे (रा. चिटणवीसपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे आहेत.

भगवान तळेकार

भगवान चैतुजी तळेकार (८५, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश भाेतमांगे

इंडियन ओवरसीज बँकेचे निवृत्त मॅनेजर रमेश ताडोबा भोतमांगे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधाबाई कामडी

प्राध्यापक डॉ. रामदास कामडी यांच्या आई राधाबाई राजेराम कामडी (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्यावरमानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली व नातवंडे आहेत.

सुमनबाई गिरीपुंजे

सुमनबाई रामभाऊ गिरीपुंजे (वय ६४, रा. सुभाननगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संताेष देव्हारे

संताेष ज्ञानिराम देव्हारे (४४, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशाल माेहने

विशाल जाेगेंद्र माेहने (वय १५, रा. साईबाबानगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Dheeraj Pandey passes away