धनराज डहाट यांची आंबेडकरवादी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:33 IST2018-02-09T00:32:36+5:302018-02-09T00:33:32+5:30

नांदेड येथे ११ फेब्रुवारीला होणाऱ्या १७ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर नागपूरचे आंबेडकरी विचारवंत डॉ. धनराज डहाट यांची निवड झाली आहे. सत्यशोधक विचारमंच तसेच फुले-आंबेडकर विचारधारा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे हे संमेलन होत आहे.

Dhanraj Dahat elected as president of Ambedkarwadi Sahitya Sammelan | धनराज डहाट यांची आंबेडकरवादी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड 

धनराज डहाट यांची आंबेडकरवादी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड 

ठळक मुद्दे नांदेड येथे ११ फेब्रुवारीला होणार १७ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : नांदेड येथे ११ फेब्रुवारीला होणाऱ्या १७ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर नागपूरचे आंबेडकरी विचारवंत डॉ. धनराज डहाट यांची निवड झाली आहे. सत्यशोधक विचारमंच तसेच फुले-आंबेडकर विचारधारा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे हे संमेलन होत आहे.
नांदेड येथील कोरेगाव-भीमा प्रेरणा साहित्यनगरीत डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात या आंबेडकरवादी संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलनात कथाकथन, धर्मनिरपेक्ष व राष्ट्रवाद याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, चर्चासत्र, परिसंवाद होतील. याशिवाय पुण्यातील रमणी सोनवणे यांचा ‘मी रमाई बोलतेय..' हा एकपात्री प्रयोग सादर होईल. विचारवंत राजा ढाले, रेणा पाचपोर यांच्यासह प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर परिसंवादात सहभागी होणार आहेत. नागपुरातील मुक्तिवाहिनी या संस्थेच्या वतीने डॉ. धनराज डहाट यांचे आंबेडकरी चळवळीत आगमन झाले. यानंतर लाँगमार्चपासून तर रमाईनगरचे आंदोलन, खैरलांजी अशा आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत असत. रस्त्यावरच्या लढाईपासून तर आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीतील लेखक म्हणून डॉ. डहाट यांचे नाव मोठे आहे. विशेष असे की, अनेक नवलेखकांच्या साहित्याचे प्रकाशन त्यांनी केले आहे.

Web Title: Dhanraj Dahat elected as president of Ambedkarwadi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.