शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपुरात सोमवारी एटीएमने उडवली धम्माल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 21:59 IST

स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेच्या शहरातील एटीएमनी नागरिकांची धम्माल उडविली. बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याने एटीएममधून कॅश काढण्यास जाणाऱ्या ग्राहकांच्या हातात काहीच येत नव्हते. मात्र, त्या ट्रान्झॅक्शनचे डेबिट बँकेच्या अकाऊंडमधून होत होते. यामुळे, नागरिक भयभीत झाले होते.

ठळक मुद्देअनेकांच्या एटीएममधून झाले डेबिटविड्रॉल मात्र शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेच्या शहरातील एटीएमनी नागरिकांची धम्माल उडविली. बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याने एटीएममधून कॅश काढण्यास जाणाऱ्या ग्राहकांच्या हातात काहीच येत नव्हते. मात्र, त्या ट्रान्झॅक्शनचे डेबिट बँकेच्या अकाऊंडमधून होत होते. यामुळे, नागरिक भयभीत झाले होते.एनी टाईम मनी अर्थात एटीएम, असा सर्वसामान्य अर्थ लावला जातो. मात्र, केव्हाही पैसा पुरवणारी ही बँकेची अधिकृत यंत्रणा बरेचदा नागरिकांची गफल्लत करत असते आणि त्याचा मनस्तापही सहन करावा लागत असतो. असेच चित्र सोमवारी शहरातील एसबीआय बँकेच्या एटीएम यंत्रणेबाबत दिसून येत होते. विशेष म्हणजे, एसबीआयचे एटीएम शहरात सर्वात जास्त संख्येने आहेत आणि कुठेही या बँकेचे एटीएम सहज सापडते. त्यामुळे, कुठल्याही बँकेचे ग्राहक या एसबीआयच्या या यंत्रणेतून पैसा काढण्यास पुढाकार घेत असतात. सोमवारी या बँकेच्या शहरातील बऱ्याच एटीएममध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक नागरिक एटीएम कार्ड स्वॅप करताना योग्य तऱ्हेने पिन नंबरही टाकत होते. त्याअनुषंगाने पैसा येण्याची वाट बघितली जात होती. मात्र, कॅश मशीनच्या बाहेरच पडत नव्हती. मात्र, तात्काळ ट्रान्झॅक्शन झाल्याचा एसएमएस मोबाईलवर झळकत होता. बँकेच्या खात्यातून पैसा डेबिट झाला तर गेला कुठे? असा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर पडला होता. अनेक जण बँकेला शिव्यांची लाखोलीही वाहत होते. या प्रकारामुळे अनेकांनी ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या तत्त्वानुसार उद्या पैसे काढू म्हणत काढता पाय घेतला. ज्यांना एटीएमच्या या प्रकाराची जाणीव होती, ते संबंधित पैसा डेबिट झालेल्या ग्राहकांना दिलासा देत पैसा खात्यात नक्की परत येईल, असा दिलासाही देत होते. मात्र, ज्यांच्यासोबतच असला प्रकार प्रथमच झाला, त्यांचे धाबे दणाणले होते.

टॅग्स :atmएटीएमnagpurनागपूर