अंबाझरी परिसरातून निघाली धम्म रॅली

By Admin | Updated: August 1, 2016 02:25 IST2016-08-01T02:25:53+5:302016-08-01T02:25:53+5:30

अंबाझरी बौद्ध विहारातून नुकत्याच निघालेल्या विशाल धम्म रॅलीने संपूर्ण वसाहतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Dham Rally from Ambajari area | अंबाझरी परिसरातून निघाली धम्म रॅली

अंबाझरी परिसरातून निघाली धम्म रॅली

अंबाझरी : अंबाझरी बौद्ध विहारातून नुकत्याच निघालेल्या विशाल धम्म रॅलीने संपूर्ण वसाहतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या रॅलीत ५०० वर भिक्खू सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात आमदार प्रकाश गजभिये यांनी भिक्खूंचे स्वागत करून केली.
ही धम्मरॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करीत अंबाझरी टेकडी, रमाई बुद्धविहार, अजयनगर बुद्धविहार, सुदामनगरी, धम्मदीप बुद्धविहार, मोगलायन बुद्धविहार, रामनगर, नागवंशी बुद्धविहार, पांढराबोडी, हिलटॉप, अत्तदीप भव बुद्धविहार, एकता सारीपुत्त बुद्धविहार,संमित्र बुद्धविहार, गोकुळपेठ या भागातून गेली. या सर्वच ठिकाणी रॅलीचे जोरदार स्वागत झाले. या रॅलीमध्ये राहुल झोडापे, भोजराज ढोणे, मोहित डुले, रूपेश लोखंडे, देवेन डुले, राजेंद्र कापसे, सुमेध फुलझेले, राकेश नितनवरे, दिलीप माटे, सरिता झोडापे, पूजा डुले, वर्षा धोपेकर, रंजना झोडापे, रंजना ढोणे यांच्यासह मोठ्या संख्येत उपासक-उपासिका उपस्थित होते.

Web Title: Dham Rally from Ambajari area