शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

डीजींनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

By admin | Updated: July 3, 2014 00:47 IST

फालतू कामात लक्ष घालू नका. गुन्हेगारांवर जरब बसवा, असे खडे बोल सुनावत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज अनेक पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नागपुरातील गुन्हेगारी

फालतू कामात लक्ष घालू नका : गुन्हेगारांवर जरब बसवा नागपूर : फालतू कामात लक्ष घालू नका. गुन्हेगारांवर जरब बसवा, असे खडे बोल सुनावत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज अनेक पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नागपुरातील गुन्हेगारी उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक दयाल यांनी आज जिमखान्यात पोलीस अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली. बैठकीला पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांच्यासह सर्व झोनचे उपायुक्त, सहायक आयुक्त, आणि ठाणेदार हजर होते. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ बैठकीत त्यांनी नागपुरात उसळी मारलेल्या गुन्हेगारीचा सविस्तर आढावा घेतला. अवघ्या २४ तासात ६ खून झाले. त्यातील खुनाच्या तीन घटना टोळीयुद्धातून घडल्या. टोळीयुद्धाचा भडका उडाल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. याशिवाय, बलात्कार, घरफोडी, जबरी चोऱ्या, लुटमार, प्राणघातक हल्ले, खंडणी वसुली, अपहरण असे गंभीर गुन्हे सारखे सुरूच आहेत. त्यामुळे नागपूरकर जनता अस्वस्थ आहे. लोकमतने नागपुरातील उफाळलेल्या गुन्हेगारीचे वृत्त २४ जूनच्या अंकात सविस्तर आणि ठळकपणे प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालनालयानेही गंभीरपणे घेतली. लोकमतच्या वृत्ताची चर्चा आठवडाभरापासून गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालनालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, चार दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांचा नागपूर दौरा ठरला. येथे ते अधिकाऱ्यांची ‘खबरबात‘ घेणार हे अपेक्षित होते. तसेच झाले. शहरात फोफावलेली गुन्हेगारी, त्याची कारणे, गंभीर गुन्ह्यांचा रखडलेला तपास, मोकाट गुंड, गुंडांच्या टोळ्या, त्यांच्या हालचाली, कार्यपद्धती अन् त्या- त्या भागाच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबतचा पोलीस महासंचालक दयाल यांनी आजच्या बैठीकीत सविस्तर आढावा घेतला. खून, हाणामाऱ्या, खंडणी वसुली, चेनस्नॅचिंग, घरफोड्या, टोळीयुद्ध, मोकाट गुंड तसेच भूमाफियांचे विषय चर्चेला घेत दयाल यांनी अनेक ठाणेदारांना धारेवर धरले. हॉटेल, पानटपऱ्या बंद केल्याने गुन्हेगारी नियंत्रणात येणार नाही. फालतू कामात लक्ष घालण्याऐवजी गुन्हेगारांवर वचक निर्माण करा, असे सुनावतानाच महिन्याभरात हे सर्व झाले पाहिजे, असा अल्टिमेटमही महासंचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. नंदनवन, लकडगंज, गिट्टीखदान, अंबाझरी, प्रतापनगर आणि सीताबर्डीतील अधिकाऱ्यांसोबत पोलीस महासंचालकांनी ‘खास चर्चा‘ केली. गिट्टीखदानच्या ठाणेदारांनी चांगले ‘प्रेझेंटेशन‘ दिले. पहिल्या सत्रातील बैठक खरडपट्टीचीच होती.दुसऱ्या सत्राच्या बैठकीत पोलीस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त आणि पोलीस आयुक्तांना डीजींनी संबोधित केले. गुन्हेगारी नियंत्रणासाठी काय उपाययोजना करणार आहात, हे जाणून घेतानाच स्थानिक पोलिसांना मुख्यत्वे कोणत्या अडचणी येत आहे, त्यासुद्धा त्यांनी जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)