जेएमएफसी न्यायालयाकडून देवेंद्र फडणवीस यांना व्यक्तिश: हजेरीपासून सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 15:33 IST2019-12-04T15:25:12+5:302019-12-04T15:33:11+5:30
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वकिलामार्फत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. डी. मेहता यांच्या न्यायालयात सादर केलेला अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना आता 4 जानेवारी ही तारीख देण्यात आली.

जेएमएफसी न्यायालयाकडून देवेंद्र फडणवीस यांना व्यक्तिश: हजेरीपासून सूट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅड. सतीश उके यांच्याद्वारे दाखल फौजदारी प्रकरणावरील सुनावणीला व्यक्तिश: हजर राहण्यापासून सूट मिळावी याकरिता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वकिलामार्फत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. डी. मेहता यांच्या न्यायालयात सादर केलेला अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना आता 4 जानेवारी ही तारीख देण्यात आली.
फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन न्यायप्रविष्ट फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही. त्यांनी ही कृती जाणिवपूर्वक केली. त्यामुळे त्यांच्यावर लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी विनंती उके यांनी या प्रकरणात न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने गेल्या ४ नोव्हेंबर रोजी फडणवीस यांना समन्स बजावून ४ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले होते.