देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात गरजूंना वाढलं जेवण; कार्यकर्त्यांना शाबासकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:28 IST2020-05-15T18:24:26+5:302020-05-15T22:28:50+5:30
माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी नागपुरातील त्रिमूर्तीनगर येथे गरजूंना भोजन वितरित केले.

देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात गरजूंना वाढलं जेवण; कार्यकर्त्यांना शाबासकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी नागपुरातील त्रिमूर्तीनगर येथे गरजूंना भोजन वितरित केले.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून नागपुरात भाजपतर्फे कम्युनिटी किचन अंतर्गत विविध ठिकाणी गरजू व गरीबांना भोजन वितरित केले जात आहे. यापूर्वी पक्षातर्फे गरजूंना धान्य किटचेही वितरण करण्यात आलेले आहे. सध्या फडणवीस हे नागपुरात असून ते पक्षातर्फे सुरु असलेल्या विविध कम्युनिटी किचनला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. शुक्रवारी सकाळी ११.२० वाजता त्यांनी त्रिमूर्तीनगर येथील गजाजन मंदिर जवळ सुरु असलेल्या भोजन वितरण ठिकाणी भेट दिली. इतकेच नव्हे तर स्वत: गरजूंना भोजनही वितरित केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक करीत अशीच मदत करा, अशा सूचना केल्या. तसेच नागरिकांशी संवादही साधला. त्यांना योग्य भोजन मिळते का? अशी विचारणा केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दटके, नगरसेवक लहुकुमार बेहते, किशोर वानखेडे उपस्थित होते.