शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस - चंद्रशेखर बावनकुळे यांची नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 13:59 IST

तीनही नेत्यांमध्ये झाली तब्बल दोन तास प्रदीर्घ चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महायुतीचे जागा वाटत अंतिम टप्प्यात असून, लवकरच भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहचले. या तीनही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत विदर्भातील जागा वाटपासह उमेदवारांच्या नावांवर गडकरींची सहमती घेण्याचे प्रयत्न झाले.  नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जागांवर गडकरींचा पगडा आहे. शिवाय गडकरींना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे येथील जागांसह उमेदवारांबाबत गडकरींचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी फडणवीस व बावनकुळे यांनी अंतिम चर्चा केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही चर्चा सुरू असताना भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर हेदेखील गडकरींच्या घरी पोहचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांच्या नावाबाबत गडकरींनी दोन्ही नेत्यांना काही जागांवर महत्त्वपूर्ण सूचनाही केल्याची माहिती आहे.

पदाधिकारी देवगिरीवर

भाजपचे माजी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यावरील निलंबन कारवाईमुळे नाराज भाजप पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेत सामूहिक राजीनामे दिले होते. या सर्व नाराज पदाधिकाऱ्यांना शनिवारी रात्री देवगिरीवर बोलावण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे