खासदार दत्तकग्रामात विकास कामांना सुरूवात
By Admin | Updated: June 11, 2017 00:56 IST2017-06-11T00:56:19+5:302017-06-11T00:56:19+5:30
गाव विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून पुढाकार घ्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी पारडी या दत्तक गावी विकास

खासदार दत्तकग्रामात विकास कामांना सुरूवात
रामदास तडस उपस्थित : पारडीत कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : गाव विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून पुढाकार घ्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी पारडी या दत्तक गावी विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी केले. सोबत माजी आमदार दादाराव केचे, सभापती मंगेश खवशी, समाजकल्याण सभापती निता गजाम व उपसभापती रंजना टिपले, जि.प. सदस्य सुरेश खवशी उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांच्या आदर्शगाव योजनेंतर्गत खा. तडस यांनी पारडी हे गाव दत्तक घेतले असून या गावचा सर्वांगीन विकास करण्याचा संकल्प केला आहे. दत्तकग्राम योजनेच्या निधीतून पारडी येथे प्रवाशी निवारा, मोरेश्वर टिपले ते मुंगले यांचे घरासमोर सिमेंट रोड, यादव वाहाने ते झेंड्यापर्यंतचा सिमेंट रस्ता तसेच हेटी येथील दिलीप चरडे ते पुरूषोत्तम टिपले यांचे घरापर्यंत सिमेंट रोड, पारडी व एकांबा येथे हँडपंप बसविणे आदी कामांना खा. तडस यांच्याहस्ते सुरुवात करण्यात आली.