शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपुरात ११ लाखांच्या खंडणीसाठी डेव्हलपर्सचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:30 PM

राहुल आग्रेकर अपहरण हत्याकांडाच्या थरारक घटनाक्रमातून नागपूरकर अद्याप सावरायचे असताना हिंगण्यातील एका डेव्हलपर्सचे अपहरण करून त्याला एमआयडीसीतील बंद कंपनीत बंधक बनविण्यात आले. मारहाण करून त्याच्याकडून ११ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली

ठळक मुद्देबंद कंपनीत मारहाणखंडणी देण्याच्या अटीवर सोडले

आॅनलाईन लोकमतनागपूर : राहुल आग्रेकर अपहरण हत्याकांडाच्या थरारक घटनाक्रमातून नागपूरकर अद्याप सावरायचे असताना हिंगण्यातील एका डेव्हलपर्सचे अपहरण करून त्याला एमआयडीसीतील बंद कंपनीत बंधक बनविण्यात आले. मारहाण करून त्याच्याकडून ११ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणीची रक्कम देण्याचे आश्वासन देत सुनील देवरावजी निंबुळकर (वय ३७) नामक डेव्हलपर्सने हातपाय जोडून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. शनिवारी सायंकाळी ही माहिती चर्चेला आल्याने पुन्हा एकदा उपराजधानीत खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनालाही हादरा बसला आहे.सुनील हिंगण्यातील पंचवटी पार्कमध्ये राहतात. गुरुवारी, ३० नोव्हेंबरला दुपारी २ च्या सुमारास ते अंबाझरीतील रामनगर चौकात उभे होते. एमआयडीसीतील मातोश्रीनगरातील रहिवासी आरोपी तुषार चौहाण, राहुल शर्मा, पंकज सफेलकर आणि त्यांचे साथीदार तेथे सफारी कारमधून आले. त्यांनी सुनीलला जबरदस्तीने आपल्या सफारीत ओढले. एमआयडीसीतील रायसोनी कॉलेजजवळ एमएमसी नावाची बंद पडलेली कंपनी आहे. आतमध्ये नेऊन आरोपींनी सुनीलला मारहाण केली. ११ लाख रुपये तातडीने दे, अन्यथा राहुल आग्रेकरसारखा तुझे कांड करू, तुझ्या परिवारातील सदस्यांवरही हल्ला होईल, अशी धमकी आरोपींनी दिली. आग्रेकर कांडाचे नाव घेताच थरारलेल्या सुनीलने आरोपींचे हातपाय जोडले. मला जाऊ द्या, मी लगेच इकडून-तिकडून ११ लाखांची व्यवस्था करतो, असे म्हणत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपड केली. आरोपींनी बराच वेळ त्याला बंधक बनवून ठेवल्यानंतर तातडीने रक्कम आणून दे म्हणत, त्याच्या जवळचे पाच हजार रुपये हिसकावुन घेतले. त्यानंतर सुनीलचा मोबाईल आणि गाडीची चावी देऊन धमकी देत त्याला हाकलून लावले.धावपळ करीत सुनील घरी पोहचला. त्याची अवस्था बघून कुटुंबीयांनी त्याला खोदून खोदून काय झाले, याबाबत विचारणा केली. तेव्हा सुनीलने अपहरण आणि खंडणीसाठी मारहाण केल्याची माहिती घरच्यांना सांगितली. घरच्यांनी त्याला आश्वस्त करीत शुक्रवारी हिंगणा पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर प्रकरण अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगून अंबाझरी पोलिसांनी ती माहिती अंबाझरी ठाण्यात कळविली.सीसीटीव्हीत घटना कैदअंबाझरी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अंबाझरीतील रामनगर चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी मारहाण करून सुनीलला जबरदस्तीने कारमध्ये बसविताना दिसतात. त्यामुळे तांत्रिक का होईना सुनीलचे अपहरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.आरोपी कुख्यात गुंडया प्रकरणातील सर्व आरोपी कुख्यात गुंड आहेत. आरोपी राहुलवर हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल असून, तुषार तसेच पंकजविरुद्धही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यांची हिंगणा, एमआयडीसी परिसरात प्रचंड दहशत असल्याचेही सांगितले जाते.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर