शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांच्या अनुभवातून विकास साधणार

By admin | Updated: July 26, 2016 02:25 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कायम अधिष्ठाता म्हणून डॉ. मीनाक्षी वाहणे यांची वर्णी लागली आहे.

मेयोच्या अधिष्ठातापदी मीनाक्षी वाहणेनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कायम अधिष्ठाता म्हणून डॉ. मीनाक्षी वाहणे यांची वर्णी लागली आहे. सोमवारी सकाळी त्या ‘आॅर्डर’ घेऊनच मेयोत आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. वैद्यकीय सेवेच्या २५ वर्षांच्या अनुभवातून मेयोचा विकास साधणार, अशी कुबली त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.डॉ. मीनाक्षी वाहणे (गजभिये) या मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांनी १९८१ मध्ये मेयो येथूनच एमबीबीएसचे शिक्षण घेतले. आंबेजोगाई मेडिकल येथून ‘रेडिओलॉजी’ या विषयात एमडीचे शिक्षण पूर्ण केले. येथेच त्यांनी सुरुवातीला सहायक प्राध्यापक आणि नंतर सहयोगी प्राध्यापक म्हणून १२ वर्षे काम पाहिले. नंतर त्यांची बदली यवतमाळ, नागपूर, अकोला, पुणे आणि मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये झाली. येथे त्या रेडिओलॉजीच्या विभागप्रमुख होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची निवड झाल्याने त्यांचा अधिष्ठाता पदाचा मार्ग मोकळा झाला.मेयोचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांची पदोन्नती झाल्यानंतर डॉ. मधुकर परचंड हे प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात मेयोच्या विकासात हातभार लावला. दरम्यानच्या काळात डॉ. परचंड यांच्याकडे कायम अधिष्ठाता पदाची सूत्रे येणार असल्याचे बोलले जात होते. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागात खातेपालट होताच हा बदल झाल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. यात आमदार डॉ. मिलिंद माने यांचा मोठा हातभार लागल्याचे समजते.(प्रतिनिधी)मेयोचा दर्जा सुधारणार डॉ. मीनाक्षी वाहणे म्हणाल्या, ‘मेयो’च्या विकासात अनेक अडथळे आहेत. परंतु २५ वर्षांचा अनुभव व कौशल्याचा वापर करीत ते दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य व तत्काळ उपचार मिळणे हा त्याचा हक्क आहे. तो मिळाल्यास त्या रुग्णालयाची प्रगती होते, असा माझा समज आहे. यामुळे त्यादृष्टीनेही प्रयत्न होणार आहे. गेल्या काही वर्षांत गरिबांचे रुग्णालय म्हणून शासकीय रुग्णालयांची ओळख निर्माण झाली आहे. मेयोबाबत ही ओळख पुसून काढण्यासाठी मध्यमवर्गीयांसोबतच श्रीमंत रुग्णही येथे उपचारांसाठी येतील, यासाठी रुणालयाचा दर्जा वाढविण्याला प्राधान्य दिले जाईल. मेडिकल कॉलेजचे प्रथम उद्दिष्ट हे चांगले डॉक्टर घडविणे हे आहे. मेयोचा विचार केल्यास येथे ‘एमआरआय’ नसतानाही विद्यार्थी रेडिओलॉजीचे उच्चशिक्षण घेत आहेत. या सारख्या अनेक प्रश्नांचे निराकरण करून विद्यार्थ्यांना सोई उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न राहणार आहे.