शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

उपद्रव शोध पथक करणार नागपूरच्या स्वच्छता व शिस्तीची देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:26 AM

शहरातील अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,प्लास्टिकचा वापर, थुंकणे व लघवी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपद्रव शोध पथक गठित केले आहे.

ठळक मुद्देसर्व प्रभागात एनडीएस जवान नियुक्त करणार८७ जवान कार्यरत, पुन्हा ६४ जणांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,प्लास्टिकचा वापर, थुंकणे व लघवी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. यात माजी सैनिकांचाच समावेश असावा, अशी तरतूद करण्यात आली होती. अशा एकूण १५१ जवानांची नियुक्ती करण्याला सभागृहाची मंजुरी आहे. परंतु यात सुरुवातीला ४६ जवानांची नियुक्ती करण्यात आली. शहराचा होत असलेला विस्तार लक्षात घेता, आयुक्त अभिजित बांगर यांनी पथकातील जवानांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात सध्या ८७ माजी सैनिक कार्यरत आहेत. पुन्हा ६४ जवानांनी भरती करून ही संख्या १५१ पर्यंत वाढवून त्यांची सर्व प्रभागात नियुक्ती केली जाणार आहे.नागरी पोलिसांच्या धर्तीवर आरोग्य विभागाने उपद्रव शोध पथक गठित क रण्याचा निर्णय घेतला. २० जून २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत या पथकात १५१ माजी सैनिकांची भरती करण्याला मंजुरी देण्यात आली. तत्क ालीन आयुक्तांनी ८७ माजी सैनिकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. परंतु ४६ जवानांचीच नियुक्ती करण्यात आली. शहराचा होत असलेला विस्तार विचारात घेता, उपद्रव शोध पथकातील जवानांची संख्या ८७ पर्यंत वाढविण्यात आली. शहरातील स्वच्छतेची समस्या, अतिक्रमण, प्लास्टिकचा वापर अशा घटनांना आळा घालण्यासाठी पथकात पुन्हा ६४ जवानांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.विशेष म्हणजे ७६ सुरक्षा जवान, १० सुपरवायझर, १ विशेष कार्य अधिकारी यांची ११ महिन्यांच्या मानधनावर नियुक्ती के ली जाणार आहे. यावर २ कोटी ४७ लाख ५० हजार रुपये खर्च येत आहे. परंतु महापालिकेच्या तिजोरीतून हा खर्च करावा लागत नाही. पथकाकडून कारवाई करताना आकारण्यात येणाºया लाखो रुपयांच्या दंडाच्या रकमेतून मानधन दिले जात आहे. शहरातील अतिक्रमणाला आळा घालणे, प्लास्टिक कारवाई व डुक्कर पकडण्याच्या कामात पथकाची महत्त्वाची भूमिका आहे.नवीन ६४ जवानांच्या नियुक्तीवर महापालिकेला ११ महिन्यात १.६९ कोटी खर्च करावे लागतील. परंतु दंडाच्या रकमेतून याहून अधिक रक्कम वसूल होण्याची अपेक्षा आहे.दंडाची रक्कम वाढविण्याचा प्रस्तावसार्वजनिक जागेवर थुंकणे, लघवी केल्याचे आढळून आल्यास महापालिकेतर्फे अनुक्रमे १०० व २०० रुपये दंड आकारला जातो. महापालिका आयुक्तांनी ३१ आॅक्टोबर २०१९ ला दिलेल्या प्रस्तावात थुंकल्यास २०० रुपये व लघवी केल्यास ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्याची सूचना केली आहे. स्थायी समितीकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.सुविधांच्या मोबदल्यात शुल्क द्यावे लागणारशहरातील सार्वजनिक स्थळांची साफसफाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. खासगी व व्यावसायिक क्षेत्रासाठी महापालिकेतर्फे शौचालय, लिकेज काढणे, सेप्टिक टँक खाली करणे, बांधकामासाहित उचलण्याचे काम महापालिकेला करावे लागते. आता अशा सेवांसाठी खासगी व व्यावसायिकांना जादा शुुल्क द्यावे लागणार आहे. खासगी कामासाठी मोबाईल टॉयलेटसाठी प्रति दिवस ५ हजार, सामाजिक व धार्मिक कामासाठी लागल्यास प्रति दिवस २ हजार, शहराबाहेर ५ हजार व कारखाना विभागाने प्रति किलोमीटरनुसार निश्चित के लेल्या दरानुसार शुुल्क द्यावे लागेल. खासगी चोकेज काढण्यासाठी ५०० रुपये प्रति चोकेज, चेंबर, खासगी जेटिंग, सक्शनसाठी ५ हजार रुपये व कारखाना विभागाने निश्चित केलेल्या प्रति किलोमीटरनुसार जादाचे दर द्यावे लागतील. बिल्डिंग मटेरियल उचलण्यासाठी टिप्परच्या प्रत्येक फेरीसाठी २ हजार रुपये द्यावे लागेल.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका