विवरण प्रक्रिया सुलभ व्हावी
By Admin | Updated: June 1, 2014 01:00 IST2014-06-01T01:00:33+5:302014-06-01T01:00:33+5:30
एलबीटीमधील तरतुदींमुळे व्यापारी त्रस्त आहेत. एलबीटी हटविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले असले तरीही व्यापार्यांना ठराविक तारखेपर्यंंत विवरण भरावेच लागेल. व्यापारी एलबीटी भरण्यास तयार आहे,

विवरण प्रक्रिया सुलभ व्हावी
एलबीटीवर कार्यशाळा : एनसीसीएलचे आयोजन
नागपूर : एलबीटीमधील तरतुदींमुळे व्यापारी त्रस्त आहेत. एलबीटी हटविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले असले तरीही व्यापार्यांना ठराविक तारखेपर्यंंत विवरण भरावेच लागेल. व्यापारी एलबीटी भरण्यास तयार आहे, पण प्रक्रिया सुलभ असावी, असा सूर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी येथे काढला.
नागपूर चेंबर ऑफ कॉर्मसच्यावतीने सीताबर्डी येथील हिंदी मोरभवन येथे एलबीटीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मंचावर नागपूर सीए शाखेचे अध्यक्ष अश्विनी अग्रवाल, सीए स्वप्निल घाटे, चेंबरचे अध्यक्ष कैलास जोगानी, सीए शैलेंद्र जैन आणि चेंबरचे सचिव प्रदीप जाजू होते.
अश्विनी अग्रवाल यांनी सांगितले की, एलबीटी वसुलीद्वारे मनपाला २00 कोटींची तोटा झाला आहे. प्रत्येक वस्तूचे विवरण देणे शक्य नाही. शेड्युलमध्ये प्रत्येक वस्तू एकाच हेडखाली आणाव्यात. प्रशासनात सुधारणा करावी, ऑनलाईन फायलिंग व्हावे, त्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर असावे, खरेदीवर सेटऑफ तरतूद हटवावी आदींची माहिती सोदाहरण दिली.
जैन यांनी सांगितले, एलबीटीचा व्हॅटमध्ये समावेश केल्यास कोणत्या जिल्ह्याचे कलेक्शन किती येईल हे कळणार नाही. या कराला व्यापार्यांचा विरोध आहे. तो रद्द व्हावा. माल विकणार्यावर कर न आकारता, बाहेरून माल येतो, त्यावर कर आकारावा.
कैलास जोगानी यांनी सांगितले की, एलबीटीची प्रॅक्टिस फार कमी सीए करतात. त्यांचा सहभाग कमी व्हावा. हा कर रद्द झाल्यानंतरही ठराविक कालावधीत रिटर्न भरणे अनिवार्य आहे.
कार्यक्रमात कमलेश शाह, विपीन पनपालिया, भागीरथ मुरारका, महेंद्र कटारिया, विष्णूकुमार पचेरीवाला, पुरुषोत्तम ठाकरे, लक्ष्मीकांत मुरारका, शंभूदयाल टेकरीवाल, विजय जयस्वाल, नाथाभाई पटेल, गजानन वाघमारे, योगेंद्र अग्रवाल, नितीन बन्सल, हंसराज पोद्दार, प्रकाश त्रिवेदी, सीए संदीप जेतवानी, अभय अग्रवाल, डी.पी. सारडा, सतीश सारडा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)