शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

हत्तीरोगासोबतच खरुज व डोक्यातील उवांचाही नाश; अडीच लाखांवर लोकांनी घेतल्या औषधी

By सुमेध वाघमार | Updated: August 22, 2023 15:32 IST

२१ टक्क्यांपर्यंत उदिष्ट साद्य : ३१ ऑगस्टपर्यंत १२ लाख ३० हजार ३५२ लोकांना औषधी खाऊ घालण्याचे लक्ष्य

नागपूर : हत्तीरोग डास चावल्याने संक्रमीत होणारा रोग आहे. या आजारात मृत्यू होत नसला तरी बाह्य अवयवावर सूज येऊन विकृती येते. हत्तीरोग सामुदायीक औषधोपचार मोहिमेत देण्यात येणाऱ्या औषधामुळे हत्तीपाय व अंडवृद्धी पासून बचाव करता येतो. शिवाय, पोटातील धोकादायक इतरही जंतूचा नाशकरुन खरुज व डोक्यातील उवांचाही नाश करते, अशा स्वरुपातील जनजागृती केली जात असल्याने मोहिमेला यश येत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार दिवसांतच नागपूर ग्रामीण भागातील सहा तालुक्यांमध्ये २ लाख ५९ हजार ५९१ पात्र लाभार्थांनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचे सेवन केले आहे. २१ टक्क्यांपर्यंत उदिष्ट साद्य झाले आहे.

शरीराचा कोणताही लोंबणारा भाग हा हत्तीरोगाने संक्रमीत असू शकतो. हत्तीरोगाची लक्षणे हातापायावर सूज ( हत्तीपाय), पुरुषामध्ये वृषणदाह (अंडवृद्धी), स्त्रीयांमध्ये स्तनवृद्धी, जननइंद्रियावर सूज येते. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागपूर जिल्ह्यात १७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान हत्तीरोग दुरीकरण करण्याकरिता हत्तीरोग सामुदायीक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे.

हिंगणा, नागपूर, कामठी, कुही, उमरेड, भिवापूर या कार्यक्षेत्रात त्रिगुणी औषधोपचार मोहिमे अंतर्गत हत्तीरोग विरोधी डी. ई.सी., अ‍ॅलब्नेडाझोल, आयवरमेक्टीन गोळयांचा उपचार समक्ष करण्यात येत आहे. या मोहिमेत २ वर्षा वरील सर्व लाभार्थांना वयोगटा नूसार व उंची नुसार गोळ्या खाऊ घालण्यात येत आहे. सदर मोहिमेत खासगी शाळा, खासगी महाविद्यालय, खासगी दवाखाने, शासकीय दवाखाने, डब्लयू.सी.एल., सहकारी बँक, सरकारी बँक, या ठिकाणी बूथ लावून प्रत्यक्ष गोळा खाऊ घालण्यात आल्या आहे.

या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे  यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचे सेवन करून केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सुद्धा गोळ्यांचे सेवन केले. आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ. श्यामसुंदर निमगडे या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हत्तीरोग दुरीकरण २०२३ ची यशस्वीतेकडे वाटचाल सुरू आहे. ३१ ऑगस्टपर्यंत १२ लाख ३० हजार ३५२ लोकांना औषधी खाऊ घालण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूरzpजिल्हा परिषद