नष्ट होत असलेल्या वन्यजीवांना वाचविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 23:54 IST2019-06-25T23:53:57+5:302019-06-25T23:54:57+5:30

‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर आयोजित व्याख्यानात वॉशिंग्टन विद्यापीठातील जीव विज्ञान विभागाचे प्राध्यापक व संरक्षण जीव विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सॅम्युअल वासर यांनी सांगितले की, संपूर्ण जगात वन्य जीवाला वाचविण्यासाठी, मानवाने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपकरणे विकसित करणे गरजेचे आहे. आज नष्ट होत चाललेल्या वन्य जीवांना वाचविणे गरजेचे आहे. रमण विज्ञान केंद्रात यूएस कॉन्सुलेट जनरल मुंबई यांच्या सहकार्याने ‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर डॉ. सॅम्युअल बोलत होते.

Destroying wildlife needs to be saved | नष्ट होत असलेल्या वन्यजीवांना वाचविणे गरजेचे

नष्ट होत असलेल्या वन्यजीवांना वाचविणे गरजेचे

ठळक मुद्देरमण विज्ञान केंद्रात ‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर आयोजित व्याख्यानात वॉशिंग्टन विद्यापीठातील जीव विज्ञान विभागाचे प्राध्यापक व संरक्षण जीव विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सॅम्युअल वासर यांनी सांगितले की, संपूर्ण जगात वन्य जीवाला वाचविण्यासाठी, मानवाने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपकरणे विकसित करणे गरजेचे आहे. आज नष्ट होत चाललेल्या वन्य जीवांना वाचविणे गरजेचे आहे. रमण विज्ञान केंद्रात यूएस कॉन्सुलेट जनरल मुंबई यांच्या सहकार्याने ‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर डॉ. सॅम्युअल बोलत होते. यावेळी रमण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक विजय शंकर शर्मा यांनी नष्ट होत चाललेल्या वन्यजीवांची संख्या वाढविण्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी अमेरिकेच्या वाणिज्य सल्लागार तस्नीम कलसेकर यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी परमाणु खनिज निदेशालयाचे डॉ. अमित मजूमदार, डॉ. शेषराव, वनराईचे बाबा देशपांडे, वाईल्ड लाईफ कंजर्व्हेशन अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी उमरेडच्या डॉ. प्रज्ञा गिरडकर, नागपूरचे आरएफओ पांडुरंग पखाले, सातपुडा फाऊंडेशनचे मंदार पिंगले, डॉ. बहार बावीसकर, जयंत खेडकर, डॉ. आनंद मांजरखेडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केंद्राचे शिक्षण अधिकारी अभिमन्यु भेलावे यांनी केले. आभार विलास चौधरी यांनी मानले.

Web Title: Destroying wildlife needs to be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.