शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या धर्तीवर होणार नागपुरातील खापरी मेट्रो स्टेशनचे डिझाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:00 PM

: मेट्रो रेल्वे स्थानकाला आगळेवेगळे रूप देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. त्याअंतर्गत खापरी मेट्रो स्टेशनचे डिझाईन मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या धर्तीवर राहणार आहे.

ठळक मुद्देपर्यटकांसाठी ठरणार आकर्षणाचे केंद्र ठरणारअद्ययावत सुविधांनी सज्ज

आॅनलाईन लोकमतनागपूर : मेट्रो रेल्वे स्थानकाला आगळेवेगळे रूप देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. त्याअंतर्गत खापरी मेट्रो स्टेशनचे डिझाईन मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या धर्तीवर राहणार आहे. हे स्टेशन कुशल कारागिरी आणि कोरीव नक्षीकामाचा एक नमुना ठरणार आहे. खापरी स्टेशन भविष्यात प्रवाशांसाठीच नव्हे तर पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.स्टेशनवर संगमरवर, ज्यूट, सिरॅमिक आणि कांस्य यांच्या साहाय्याने भिंतीचित्रे, शिल्प, धातू, पेंटिंग्ज तयार करून आकर्षक दिसेल अशी निर्मिती करण्यात येत आहे. खापरी स्टेशन नागपूर-वर्धा महामार्गावर असल्याने ते या भागातील मिहान आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या आयुष्याची लाईफलाईन ठरणार आहे.सप्टेंबरमध्ये मेट्रोचे यशस्वी ट्रायल रन झाल्यानंतर आरडीएसओने या मार्गावर मेट्रोला हिरवी झेंडी दिली. एअरपोर्ट ते खापरी मार्गावर लवकरच कमर्शियल रन सुरू होणार आहे. गेल्यावर्षी १२ आॅगस्टला स्टेशनचे भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात झाली. प्रवाशांसाठी सविस्तर माहिती देण्यासाठी माहिती कक्ष राहील. दिव्यांग आणि लहान मुलांकरिता विशेष लिफ्ट, वेगवेगळे तिकीट काऊंटर आणि स्वच्छतागृह राहील. नेत्रहीनांसाठी विशेष लिफ्ट असून ती ब्रेल भाषेच्या साहाय्याने वापरता येईल. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेशापूर्वीच आॅटोमेटिक फेअर कलेक्शन सिस्टम गेट लावण्यात येत आहे. हे गेट क्यूआर कोडच्या माध्यमातून चालू व बंद होईल. यासाठी सिंगल प्रवास, परतीचा प्रवास आणि ग्रुप तिकीट या तीन प्रकारचे क्यूआर कोड तिकीट काऊंटरवर उपलब्ध असतील. भविष्यात आधुनिक सोईसुविधांनी परिपूर्ण खापरी स्टेशन लोकांच्या पसंतीस खरे उतरणार आहे.मेट्रोच्या अतिरिक्त तीन डब्यांचे आगमनमेट्रो रेल्वेच्या कमर्शियल रनची तयारी जोरात सुरू असतानाच दुसरीकडे मेट्रोच्या अतिरिक्त तीन डब्यांचे हैदराबाद येथून ५०० कि़मी.चे अंतर कापत नागपुरात आगमन झाले आहे. एकूण ६७ मीटर लांबीच्या डब्यांवर पूर्वीप्रमाणेच ग्रीनसिटी आणि संत्रानगरी अशी ओळख देण्यात आली आहे. आगमनाप्रसंगी मिहान डेपोचे सहमहाव्यवस्थापक साई सरन दीक्षित, वरिष्ठ महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) नरेंद्र उपाध्याय आणि उपमहाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) आर.आर. रमण उपस्थित होते. यापूर्वी मेट्रोचे तीन डब्बे ट्रायल रनसाठी हैदराबाद येथून आणण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Metroमेट्रोNAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन