शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

बारावीच्या निकालात 'फर्स्ट क्लास' अन् 'डिस्टिक्शन'चा उतरता ग्राफ

By योगेश पांडे | Updated: May 6, 2025 11:12 IST

विभागातून केवळ ५.२९ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण : 'फर्स्ट क्लास'चा टक्कादेखील फिका

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या निकाल यंदा विभागासाठी फारसा चांगला राहिला नाही. विशेषतः प्रावीण्य श्रेणी आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा घटली आहे. दरवर्षी प्रावीण्य श्रेणीत किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले असते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणी व प्रथम श्रेणीचा नागपूर विभागाचा टक्का मागील वर्षीच्या तुलनेत मागे आहे. जवळपास २५ टक्के विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. मागील वर्षी हाच आकडा ३७ टक्के इतका होता, तर प्रावीण्य श्रेणीतील निकालात १.७१ टक्क्यांनी घट झाली असून, केवळ ५.२९ टक्के विद्यार्थीच ७५ टक्के गुणांचा आकडा ओलांडू शकले आहेत.

यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर विभागातील विद्यार्थ्यांमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदा १.७१ टक्क्यांनी प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थी घटले. २०२४ चा अपवाद वगळला, तर २०२१ पासून प्रावीण्य श्रेणीच्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट दिसून येत आहे. २०२१ मध्ये, तर ४५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. यंदा केवळ ७हजार ९५५ विद्यार्थ्यांना 'डिस्टिंक्शन' मिळाले आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ५१ हजार १२० पैकी १ लाख ३६ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परीक्षार्थ्यांपैकी द्वितीय श्रेणीत ६९ हजार ४८८ विद्यार्थी (४५.९८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी ४४.८७ टक्के विद्यार्थी या श्रेणीत होते. 

'फर्स्ट क्लास' का घटला ?मागील वर्षी २७.०१ टक्के विद्यार्थ्यांना ६० टक्के ते ७५ टक्क्यांच्या मध्ये गुण मिळाले होते. मात्र, यात यंदा सात टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.यावेळच्या निकालात ३० हजार २६४ म्हणजेच २०.०३ टक्के विद्यार्थी 'फर्स्ट क्लास'मध्ये आले आहेत. एकीकडे प्रवेश परीक्षांकडे ओढा वाढत असताना, 'फर्स्ट क्लास'चा टक्का का घटला यावर महाविद्यालयांकडून मंथन करण्याची आवश्यकता आहे.

श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी (टक्क्यांमध्ये)श्रेणी                       २०२५             २०२४           २०२३              २०२२              २०२१प्रावीण्य                     ५.२६               ७.०९              ४.९०               १३.९०              ४६.६९प्रथम                        २०.०३              २७.०१           २३.६१               ३९.२०              ४५.३६  द्वितीय                      ४५.९८             ४४.८७           ५१.९१               ३८.३९              ७.४९केवळ उत्तीर्ण             १९.२५             १३.१५             १९.४७              ५.०६                ०,०८अनुत्तीर्ण                    ९.४७               ७.८८               ९.६५               ३.४६                ०.३८   

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षण