महावितरणच्या उपव्यवस्थापकासह कनिष्ठ लिपिकाला अडीच लाखांची लाच घेताना अटक, प्रलंबित वैद्यकीय बिल मंजूर करून घेण्यासाठी मागितली लाच

By योगेश पांडे | Updated: April 2, 2026 22:06 IST2026-04-02T22:02:08+5:302026-04-02T22:06:39+5:30

एमएसईबी सातगाव बुटीबोरी येथील मानव संसाधन विभागातील उपव्यवस्थापक गणेश नथुजी डोरले (४३) व कनिष्ठ लिपीक सुमित रेवतकर अशी आरोपींची नावे आहेत.

Deputy Manager of Mahavitaran and junior clerk arrested while accepting a bribe of Rs 2.5 lakh, bribe demanded to get pending medical bill approved | महावितरणच्या उपव्यवस्थापकासह कनिष्ठ लिपिकाला अडीच लाखांची लाच घेताना अटक, प्रलंबित वैद्यकीय बिल मंजूर करून घेण्यासाठी मागितली लाच

महावितरणच्या उपव्यवस्थापकासह कनिष्ठ लिपिकाला अडीच लाखांची लाच घेताना अटक, प्रलंबित वैद्यकीय बिल मंजूर करून घेण्यासाठी मागितली लाच

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरणच्या उपव्यवस्थापकासह कनिष्ठ लिपिकाला अडीच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या घरीच ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय बिल मंजूर करून देणे आणि मिळालेल्या एरिअर्सची रक्कम देण्याच्या बदल्यात ही लाच मागण्यात आली होती.

एमएसईबी सातगाव बुटीबोरी येथील मानव संसाधन विभागातील उपव्यवस्थापक गणेश नथुजी डोरले (४३) व कनिष्ठ लिपीक सुमित रेवतकर अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार हे एमएसईबी कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. काही काळापूर्वी कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात त्यांचा उजवा हात कापला गेला होता. या घटनेनंतर त्यांचे वैद्यकीय बिल मंजूर होणे तसेच एरिअर्सची रक्कम मिळणे या बाबी प्रलंबित होत्या. संबंधित कामे मंजूर करून देण्यासाठी महावितरणच्या मानव संसाधन विभागातील डोरले व रेवतकरकडून लाचेची मागणी करण्यात आली. अडीच लाखांची लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाकडून सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराची स्थिती पाहता त्यांच्या घरीच जाऊन डोरलेने पैसे घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे गुरुवारी डोरले लाच घेण्यासाठी तक्रारदाराकडे पोहोचला. तेथे लाच स्वीकारल्यावर लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून अडीच लाखांच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. चौकशीच्यादरम्यान रेवतकरदेखील यात सहभागी असल्याची बाब समोर आली. डोरलेला ताब्यात घेण्यात आले व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया, भरत ठाकूर, अनिल बहिरे, उपेंद्र आकोटकर,कांचन गुलबासे, विकेश राऊत व प्रिया नेवारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title : महावितरण अधिकारी लंबित चिकित्सा बिल मंजूरी के लिए रिश्वत लेते गिरफ्तार।

Web Summary : महावितरण के उप प्रबंधक और कनिष्ठ लिपिक को ₹2.5 लाख की रिश्वत लेते गिरफ्तार किया गया। उन्होंने एक वरिष्ठ तकनीशियन के लंबित चिकित्सा बिलों और बकाया राशि को मंजूरी देने के लिए पैसे मांगे। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने शिकायतकर्ता के आवास पर उन्हें रंगे हाथों पकड़ा।

Web Title : Mahavitaran Officials Arrested Accepting Bribe for Pending Medical Bill Clearance.

Web Summary : Mahavitaran's deputy manager and junior clerk arrested taking ₹2.5 lakh bribe. They demanded money for clearing pending medical bills and arrears of a senior technician. Anti-Corruption Bureau caught them red-handed at the complainant's residence.