शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
2
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
3
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
4
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
5
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
6
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
7
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
8
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
9
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
10
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
11
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
12
IND vs PAK : पाकिस्तानच्या खेळाडूंना आता घरी बसवा; भारताकडून पराभव होताच अक्रम संतापला
13
२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM
14
"दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या"; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश
15
चंद्राबाबू मुख्यमंत्री होण्यापूर्वी लक्ष्मीची झाली कृपा; कुटुंबाच्या संपत्ती १२ दिवसांत १,२२५ कोटींची तेजी
16
'पाकिस्तानशी युद्ध करावे लागेल...', रियासी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेचें मोठे वक्तव्य
17
मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 
18
...तर आमच्याविरूद्ध फलंदाजी करणं कठीण; पराभव होताच पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणाले...
19
PM मोदींचे मंत्री शपथ घेत असताना मागे दिसलेला प्राणी कोणता?; मांजर, कुत्रा की बिबट्या?; व्हिडीओ पाहून चर्चेला उधाण
20
प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?

देवेंद्र फडणवीस- बावनकुळे भेटीसाठी आशिष देशमुखांच्या घरी, भाजपाची अशी कुठली मजबुरी?

By कमलेश वानखेडे | Published: May 20, 2023 2:55 PM

देशमुख म्हणाले होते दक्षिण-पश्चिमचा कसबा होईल : सावनेर, काटोलातही टिकले नाहीत

नागपूर : कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आता दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचाही कसबा होईल, अशी तिखट प्रतिक्रिया देत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी आशिष देशमुख यांनी नेम साधला होता. आता फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी त्याच देशमुखांच्या घरी जाऊन भेट घेतली. नाश्ताही केला. त्यामुळे देशमुखांना जवळ करण्यासाठी भाजपची अशी कुठलही मजबुरी आहे, असा प्रश्न राजकीय वर्तळात चर्चेला आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही नेत्यांनी शनिवारी सावनेर व काटोल या दोन्ही मतदारसंघात शासकीय आढावा बैठकांसह कार्यकर्ता मेळावेही घेतले. सावनेरमध्ये बाहेरचा उमेदवार देणार नाही, तुमच्यातलाच ‘चंद्रगुप्त’ लढेल, असे फडणवीस यांनी सावनेरच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना आश्वस्तही केले. त्यानंतर लगेच फडणवीस व बावनकुळे हे शनिवारी आशीष देशमुख यांच्या सिव्हिल लाईन्स येथील ‘बरकत’ या निवासस्थानी पोहचले.

नाश्ता करीत चर्चाही केली. निश्चितच ही भेट सहज नव्हती. तिला राजकीय कंगोरे आहेत. सावनेर, काटोलसाठी भाजपकडून सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. या भेटीमागे विधानसभेचे गणित असण्याचीही शक्यता आहे. विशेष म्हणजे भेटीनंतर देशमुख यांनी फडणवीस यांच्या कार्यशैलीची प्रशंशाही केली. त्यामुळे लवकरच देशमुख यांनी पुन्हा एकदा घरवापसी होण्याची शक्यता आहे.

आधी प्रवेश, तिकिटाचे नंतर बघू

भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत फडणवीस-बावनकुळे यांनी देशमुख यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास सकरात्मकता दर्शविली. मात्र, उमेदवारी संदर्भात आताच ठोस आश्वासन देण्याचे टाळले. आता पक्षाचे काम करा, तिकीटाचे नंतर काय ते पाहू, असे सांगत देशमुख यांना अधांतरी लटकवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

काटोल, सावनेरचे पदाधिकारी देशमुखांवर नाराज

२००९ मध्ये आशीष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत सावनेर विधानसभेची निवडणूक लढविली. काँग्रेसचे सुनील केदार यांना त्यांनी जोरात टक्कर दिली. मात्र, पराभवानंतर देशमुख पुन्हा सावनेरमध्ये फिरकलेच नाही. निवडणुकीत झटलेल्या कार्यकर्त्यांचे फोन घेणेही बंद केले. यानंतर २०१४ मध्ये त्यांनी काटोलकडे मोर्चा वळविला. काटोलमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख यांना टक्कर देत पराभूत केले. पण आमदार होऊनही समाधान झाले नाही. भाजप विरोधातच मोहिम उघडली.

तप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोप करणे सुरू केले. शेवटी आमदारकीची टर्म संपण्यापूर्वीच भाजपचा व आमदारकीचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एवढेच नव्हे तर २०१९ मध्ये ते थेट फडणवीस यांच्या विरोेधात दक्षिण-पश्चिम मतदारसंघात लढले. या सर्व घटनाक्रमामुळे काटोल व सावनेरातील भाजपचे पदाधिकारी देशमुखांवर नाराज आहेत. काम झालेे की कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवणारे व अस्थीर वागणारे देशमुख पुन्हा आमच्यावर लादू नका, अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshish Deshmukhआशीष देशमुखChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे