उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा

By योगेश पांडे | Updated: July 5, 2024 23:02 IST2024-07-05T23:01:49+5:302024-07-05T23:02:32+5:30

फडणवीस शुक्रवारी मुंबईत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर तेथून त्यांनी विमानाने नागपूर गाठले. नागपुरात आल्यानंतर ८.५० वाजताच्या सुमारास ते संघ मुख्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी सरसंघचालक व संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis at rss headquarters, discussion with Sarsanghchalk | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा



नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्येही बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस शुक्रवारी मुंबईत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर तेथून त्यांनी विमानाने नागपूर गाठले. नागपुरात आल्यानंतर ८.५० वाजताच्या सुमारास ते संघ मुख्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी सरसंघचालक व संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

यावेळी नेमकी काय चर्चा झाली ते कळू शकले नाही. मात्र लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भाजपची चांगली कामगिरी राहिली नव्हती. फडणवीस यांनी राजिनामा देण्याचीदेखील तयारी दाखविली होती. मात्र पक्षश्रेष्ठींना त्यांना तसे न करण्याची सूचना केली होती. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकालाबाबत मुंबईत सखोल मंथन झाले होते. विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने नियोजनाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालकांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis at rss headquarters, discussion with Sarsanghchalk