स्मार्ट सिटी सीईओपदी आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 02:53 PM2020-07-10T14:53:34+5:302020-07-10T14:54:54+5:30

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यापुढे स्मार्ट सिटीच्या सीईओपदी राहणार नसून त्याजागी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने हे कामकाज पाहतील असा निर्णय येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Deputy Chief Executive Officer Mahesh Morone is now the CEO of Smart City | स्मार्ट सिटी सीईओपदी आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने

स्मार्ट सिटी सीईओपदी आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने

Next
ठळक मुद्देमोरोने हे मनपा आयुक्त मुंढे यांच्याशी समन्वय ठेवून कामकाज करतील मुंढे यांच्याकडून कार्यभार काढला


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यापुढे स्मार्ट सिटीच्या सीईओपदी राहणार नसून त्याजागी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने हे कामकाज पाहतील असा निर्णय येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षनेता संदीप जाधव यांनी संचालक मंडळाच्या इतर संचालकांना पत्र पाठवून कायद्याच्या अधीन राहून निर्णय घ्यावा, असे आवाहन केले होते. तिकडे बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारी केली होती. महापालिकेतील आयुक्त विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष टोकाला गेला आहे.

स्मार्ट सिटीचे सीईओ नसताना आयुक्तांनी या पदाचे अधिकार वापरले. २० कोटींची देयके चुकवल्याचेही सत्तापक्षाकडून आरोप झाले. दरम्यान, महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त मुंढे यांच्या स्मार्ट सिटीच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. परंतु, आयुक्तांनी केलेल्या कामांचे राज्य शासनाकडून कौतुकही केले जात आहे

Web Title: Deputy Chief Executive Officer Mahesh Morone is now the CEO of Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.