शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

वीज दरवाढीच्या फेररचनेसाठी मनसेचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:25 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विजेच्या वाढलेल्या दरांमध्ये कपात करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विजेच्या वाढलेल्या दरांमध्ये कपात करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. महागाई आणि जागतिक मंदीमुळे जनता होरपळलेली असताना हा वीज दरवाढीचा बोजा सहन करण्यापलीकडचा आहे. त्यामुळे त्यात कपात करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात तसेच नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे यांचा प्रमुख उपस्थितीत तसेच शहर सचिव घनश्याम निखाडे व मध्य नागपूर अध्यक्ष शशांक गिरडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.० ते १०० युनिटचे सध्याचे विजेचे दर ३.०५ रुपये प्रति युनिट आहेत. ते कमी करून ० ते २०० युनिटपर्यंत २.०५ रुपये प्रति युनिट करावे तसेच मंदीमुळे नागपुरातील व्यापाऱ्यांवर आलेला ताण लक्षात घेता व्यावसायिक विजेचे दरसुद्धा कमी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील मंदिरे, मशीद, बुद्धविहार महानगरपालिकेच्या वतीने तोडण्यात आले. परंतु रस्त्यावरील विद्युत खांबांकडे वीज वितरण कंपनीचे नेहमीच दुर्लक्ष असते. यामुळे प्रसंगी अपघातामुळे नाहक बळी जातो. हे खांब हटविण्याचीही मागणी करण्यात आली. इतवारी निकालस मंदिर परिसरात भूमिगत लाईन करावी, विजेच्या बिलावर प्रति युनिटच्या व्यतिरिक्त आकारले जाणारे छुपे दर रद्द करावे आदी मागण्यांचा यात समावेश आहे. या संपूर्ण विषयावर ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात मनसे नागपूर शहर सचिव घनश्याम निखाडे, मध्य नागपूर अध्यक्ष शशांक गिरडे, पूर्व नागपूर अध्यक्ष उमेश उत्तखेडे, मध्य विभाग उपाध्यक्ष सुमित वानखेडे, आशीष पांढरे, अरविंद सावरकर, धीरज गजभिये, राजू पत्राळे, धीरज चिचघरे, ओंकार चन्ने, शुभम तिडके, सतीश रहांगडाले, सुरज सारवा, मोहन रामटेके, जितू गणगोज आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजbillबिलMNSमनसेNitin Rautनितीन राऊत