शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

नैराश्यामुळे मुले होतात लैंगिकतेत सक्रिय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:35 IST

अलीकडच्या काळातील जीवनशैलीमुळे किशोरावस्थेतील मुले लैंगिकतेच्या बाबतीत सक्रिय झाली आहेत. संयुक्त कुटुंबपद्धती, लैंगिक साहित्य आणि साधनांची सहज उपलब्धता, शैक्षणिक जीवनात येणारा एकटेपणा आणि त्यामुळे आलेले नैराश्य आदी कारणांनी मुले लैंगिक सक्रिय होतात, असा सूर ‘नार्चीकॉन-२०१८’च्या परिषदेत वक्त्यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देनार्चीकॉन परिषदेत वक्त्यांचा सूर : किशोरवयीन मुलांमधील लैंगिकतेवर चर्चा

नागपूर : अलीकडच्या काळातील जीवनशैलीमुळे किशोरावस्थेतील मुले लैंगिकतेच्या बाबतीत सक्रिय झाली आहेत. संयुक्त कुटुंबपद्धती, लैंगिक साहित्य आणि साधनांची सहज उपलब्धता, शैक्षणिक जीवनात येणारा एकटेपणा आणि त्यामुळे आलेले नैराश्य आदी कारणांनी मुले लैंगिक सक्रिय होतात, असा सूर ‘नार्चीकॉन-२०१८’च्या परिषदेत वक्त्यांनी व्यक्त केला.‘किशोरवयीन मुलांमधील लैंगिकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. श्रीकांत चोरघडे, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. प्राजक्ता कडूस्कर, डॉ. मंजुश्री गिरी, डॉ. मीना देशमुख, डॉ. स्वाती वाघमारे, डॉ. गुप्ता, डॉ. राजू मोहता हे सहभागी झाले होते.डॉ. गिरी म्हणाल्या, आजची मुले खूप जागरूक आहेत. ते जे बघतात त्यामुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. लहान मुलांच्या जीवनात यासाठी प्रसिद्धीमाध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या चुकीच्या प्रदर्शनामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही अशा चुकीच्या गोष्टी असतात ज्यामुळे त्यांच्या मनात चुकीच्या समजूती घर करू लागते. दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्या मुलांशी याविषयी चर्चा करताना खूप समस्या येतात. यासंबंधी बोलणे त्यांना सोपे जात नाही. पण हे तडजोड करण्यासारखे कारण नाही. लक्षात ठेवा आपल्या मुलांचे चांगले भवितव्य त्यांच्या पालकांनी दिलेल्या लैंगिक शिक्षणावरही अवलंबून असते, असेही त्या म्हणाल्या. डॉ. मेहता म्हणाले, जेव्हा आपले मूल तारुण्यात पाऊल ठेवायला लागेल तेव्हाच लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात करावी. कारण त्यांचे हेच वय अधिक घातक ठरू शकते. त्यांच्या शरीरात वेगवेगळे बदल होतात. अशा वेळेस त्यांना माहिती नसल्याने वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. त्यांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे, मी कसा जन्माला आलो किंवा मुलांचा जन्म कसा होतो. जर या संधीचा फायदा घेत आपण प्रश्नांची नीट उत्तरे दिली नाहीत तर पुढे ते जे बाहेरील जगाकडून मिळवतील व त्यावर विश्वास ठेवतील. संचालन डॉ. निशिकांत कोतवाल यांनी केले. यावेळी डॉ. अविनाश गावंडे व ‘एएचए’चे सदस्य उपस्थित होते.बाल लैंगिक अत्याचारावर उपचार बंधनकारकयावेळी सहभागी तज्ज्ञांनी सांगितले, लैंगिक अत्याचाराची विशेषत: बाल लैंगिक अत्याचाराचे कुठलेही प्रकरण आले तर प्रत्येक डॉक्टरला उपचार करणे कायद्याने बंधनकारक आहे, शिवाय तपासण्याची पद्धतही ठरवून दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाला बाल लैंगिक अत्याचारावर उपचारात्मक गोष्टी शिकणे आवश्यक आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर