ठेवीदारांना हवे मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन
By Admin | Updated: December 13, 2014 02:55 IST2014-12-13T02:55:32+5:302014-12-13T02:55:32+5:30
के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीने आठ हजार ठेवीदारांचे ७०० कोटी रुपये परत मिळावे यासाठी तसेच ...

ठेवीदारांना हवे मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन
नागपूर : के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीने आठ हजार ठेवीदारांचे ७०० कोटी रुपये परत मिळावे यासाठी तसेच ठेवीदारांचे पैसे पळविणाऱ्या भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण यांना अटक करावी, ठेवीदारांच्या नुकसानाबाबत राज्य शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून ठेवीदारांना न्याय द्यावा, या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा काढला. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे.
के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने आठ हजार ठेवीदारांच्या फसवणुकीबाबत विधान भवनावर मोर्चाचे आयोजन केले. मोर्चात दीड हजारावर ठेवीदार सहभागी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी यशवंत स्टेडियम येथून निघालेला हा मोर्चा टेकडी रोडवर पोलिसांनी रोखून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच हा मोर्चा मागे घेणार असल्याची भूमिका ठेवीदारांनी घेतली. मुख्यमंत्री परळी येथे गेले असल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत कुठलाच तोडगा निघू शकला नाही. दरम्यान गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. देवयानी फरांदे, आ. कुळकर्णी यांनी मोर्चास्थळी भेट देऊन आश्वासन दिले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे गृहराज्यमंत्र्यांना आल्यापावली परतावे लागले. दरम्यान रात्री उशीरा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना लेखी आश्वासन दिले.
नेतृत्व
करण गायकर, संजय सावंत, विजय वाहुळे, विजय काकडे
मागण्या
४शासनाकडील के. बी. सी. च्या जप्त संपत्तीचा लिलाव करून ठेवीदारांना रक्कम परत करावी
४शासन स्तरावर विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे
४भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांना अटक करण्यासाठी कार्यवाही करावी
४सर्व मागण्यांचे शासनाने लेखी आश्वासन द्यावे