शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

धान्य खरेदीची रक्कम न्यायालयात जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 9:55 PM

वाशीम व मालेगाव येथील केंद्रांद्वारे करण्यात आलेल्या धान्य खरेदीची संपूर्ण रक्कम दोन आठवड्यांत न्यायालयात जमा करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पणन महासंघाला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : पणन महासंघाला दणका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाशीम व मालेगाव येथील केंद्रांद्वारे करण्यात आलेल्या धान्य खरेदीची संपूर्ण रक्कम दोन आठवड्यांत न्यायालयात जमा करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पणन महासंघाला दिला.वाशीम व मालेगाव येथील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीची परवानगी न मिळाल्यामुळे विदर्भ अ‍ॅग्रीकल्चर प्रोसेसिंग अ‍ॅन्ड मार्के टिंग को-आॅपरेटिव्ह सोसायटीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने धान्य खरेदीची मुदत संपूनही उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन महासंघाला दणका दिला.पणन महासंघाला शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यासाठी सब-एजन्ट नेमण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार २०१७-१८ हंगामातील धान्य खरेदी करण्यासाठी याचिकाकर्ते व महासंघात करार झाला. त्यानंतर, याचिकाकर्त्यांना धान्य खरेदीची अंतिम परवानगी देण्यात आली नाही. त्याऐवजी ३० जानेवारी २०१८ रोजी वाशीम तालुका सहकारी खरेदी विक्री समितीला वाशीमकरिता तर, मालेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री समितीला मालेगावकरिता धान्य खरेदीचे सब-एजन्ट नेमण्यात आले. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. याचिकाकर्त्यांनी २०१६-१७ मधील हंगामात १२ हजार ७८५ शेतकऱ्यांकडून २ लाख क्विंटल डाळ खरेदी केली होती. त्यांच्याविरुद्ध कुणीही तक्रार केली नव्हती. असे असताना महासंघाने गेल्या हंगामात याचिकाकर्त्यांना डावलले. तत्पूर्वी याचिकाकर्त्यांना सुनावणीची संधी देण्यात आली नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अमोल देशपांडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी