हद्दपार आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST2021-06-10T04:07:39+5:302021-06-10T04:07:39+5:30

कामठी : दाेन वर्षांकरिता कामठी व नागपूर शहराबाहेर हद्दपार असलेला आराेपी शहरात चाकू घेऊन वावरताना आढळून आल्याने पाेलिसांनी त्यास ...

Deported RAP arrested | हद्दपार आराेपी अटकेत

हद्दपार आराेपी अटकेत

कामठी : दाेन वर्षांकरिता कामठी व नागपूर शहराबाहेर हद्दपार असलेला आराेपी शहरात चाकू घेऊन वावरताना आढळून आल्याने पाेलिसांनी त्यास अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.८) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

माेहम्मद शाहीद अन्सारी ऊर्फ साजिद ईजाज अन्सारी (३६, रा. वारीसपुरा, कामठी) असे अटकेतील आराेपीचे नाव असून, कामठी पाेलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत. पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांनी २८ डिसेंबर २०२० राेजी त्याला दाेन वर्षाकरिता कामठी व नागपूर शहराबाहेर हद्दपार केले हाेते. दरम्यान आराेपी हा नियमांचे उल्लंघन करून कामठी येथे वास्तव्याला असून, कमरेत चाकू लपवून शहरात वावरत असल्याची सूचना जुनी कामठी ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी शहरातील दरगाह मशिद परिसरात आराेपीला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून चाकू जप्त केला. याप्रकरणी जुनी कामठी पाेलिसांनी कलम ४/२५ आर्म ॲक्ट सहकलम १३५ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ठाणेदार राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Deported RAP arrested