शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

विनोद इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्रांचे प्रदर्शन

By admin | Updated: August 15, 2016 01:46 IST

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी व कलाश्रय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी डॉ. विनोद इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले.

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी व कलाश्रयचा उपक्रम : ५६ विद्यार्थ्यांनी शब्दांंना बांधले चित्रात नागपूर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी व कलाश्रय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी डॉ. विनोद इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रा. दीपक जोशी, ललित कला विभागाच्या प्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते, प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत चन्ने उपस्थित होते. डॉ. विनोद इंदूरकर यांनी प्रास्ताविकात या प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रतिभा कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक राहुल मुडे व अजय महाकाळकरद्वारा प्रायोजित या कार्यक्रमाला नागपुरातील अनेक कलारसिकांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, कलाकार आणि कलारसिक यांच्यामध्ये जवळीक निर्माण करण्याची क्षमता या चित्रांमध्ये आहे. दीपक जोशी म्हणाले, कलावंतांनी कवितेतील आशयाला धरून उत्तम चित्रनिर्मिती केली आहे. यावेळी कलाश्रय ग्रुपचे तसेच ललित कला विभागाचे प्रा. सदानंद चौधरी, प्रा. मौक्तिक काटे, स्नेहल लिमये, सेंट्रल इंडिया स्कूल आॅफ फाईन आर्टस्चे प्रा. बाबर शरीफ, जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक अमित गोनाडे, मिलिंद लिंबेकर, डॉ. करिष्मा कांबे, अभिषेक चौरासिया, आनंद डबली, शेखर तांडेकर,महेश मानकर, अमोल हिवरकर, धृपद गाडे, आकाश सूर्यवंशी उपस्थित होते. ७ आॅगस्ट रोजी कलाश्रय व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने डॉ. इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्रनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत ५६ कलावंतांनी जे चित्र काढले ते या प्रदर्शनात लावण्यात आले आहे. या कार्यशाळेत ललित कला विभाग, शासकीय चित्रकला महाविद्यालय, सेंट्रल इंडिया स्कूल आॅफ फाईन आर्टस्, तसेच शरद पवार चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)