परिचारिकांचे मनपा मुख्यालयात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:28 IST2020-09-09T20:25:52+5:302020-09-09T20:28:36+5:30
महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रातील मानधनावरील कार्यरत परिचारिका व आशा वर्कर्स यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात धरणे आंदोलन केले.

परिचारिकांचे मनपा मुख्यालयात धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रातील मानधनावरील कार्यरत परिचारिका व आशा वर्कर्स यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात धरणे आंदोलन केले.
मागील पाच महिन्यांपासून कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून मानधनावरील परिचारिका सुटी न घेता काम करत आहेत. परंतु त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही साधने मनपाच्या आरोग्य विभागाने उपलब्ध केलेली नाहीत. यामुळे मागील काही महिन्यात मानधनावरील ४० कर्मचारी बाधित झाले. परंतु त्यांना उपचाराची सुविधा उपलब्ध केली नाही. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळाव्यात. पीपीई किट उपलब्ध कराव्यात, उपचाराचा खर्च मिळावा, महागाई भत्ता देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी नागपूर महानगरपालिका अस्थायी आरोग्य कामगार संघटना व नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन यांच्या नेतृत्वात काम बंद व ठिय्या आंदोलन करण्यात आले. संघटनेचे नेते नेते जम्मू आनंद यांच्या यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मनपा आयुक्तांनी मार्च महिन्यापासूनचा महागाई भत्ता, पीपीई किट व पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे उपचाराची सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.