उपराजधानीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 09:51 PM2020-04-26T21:51:59+5:302020-04-26T21:52:23+5:30

पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सात ते आठ गुंडांनी शनिवारी रात्री हैदोस घातला. रिसेप्शन काऊंटर, कॉफी मशीन, टीव्ही, मॉनिटर आणि इतर वस्तूंची तोडफोड करीत आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले.

Demolition at Venus Hospital | उपराजधानीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये तोडफोड

उपराजधानीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये तोडफोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सात ते आठ गुंडांनी शनिवारी रात्री हैदोस घातला. रिसेप्शन काऊंटर, कॉफी मशीन, टीव्ही, मॉनिटर आणि इतर वस्तूंची तोडफोड करीत आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले.
पाचपावली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावलीत व्हीनस हॉस्पिटल तिसऱ्या माळ्यावर आहे. शनिवारी रात्री १० ते १०.१५ च्या सुमारास सात ते आठ गुंड तोंडावर कपडा बांधून आतमध्ये आले. त्यांच्या हातात दंडुके होते. त्यांनी आरडाओरड करीत रिसेप्शन काऊंटर, टीव्ही, काच, मॉनिटर, थम मशीन, कॉफी मशीन आदीची तोडफोड केली. तसेच खुर्च्यांची फेकाफेक केली. या प्रकारामुळे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. आरोपी आरडाओरड करीत होते कर्मचाºयांनी पाचपावली पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मात्र तत्पूर्वीच आरोपी तिथून पळून गेले होते. पोलिसांनी आरोपीबाबत विचारणा केली असता डॉक्टर किंवा तेथील कर्मचारी यांनी आरोपींपैकी कुणालाही आम्ही ओळखत नसल्याचे सांगितले. ही घटना कशामुळे घडली ते जाणून घेण्याचा पोलिसांनी पहाटे ३ वाजेपर्यंत प्रयत्न केला. मात्र हॉस्पिटलच्या संचालकांनी घटनेच्या कारणाबाबत अनभिज्ञता दर्शविली. शैलेंद्र गोविंदराव सोनारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

सीसीटीव्ही बंद
या घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी वरच्या मजल्यावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात आरोपी स्कार्फ बांधून असल्यामुळे कुणाचीही ओळख पटू शकली नाही. विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या खालच्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बंद असल्यामुळे आरोपी कशाने आले आणि कुठून कुठे पळून गेले तेसुद्धा स्पष्ट होऊ शकले नाही.

व्हीनस हॉस्पिटलमध्ये तोडफोड

Web Title: Demolition at Venus Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.