शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'मागितले रेल्वे आरक्षण, मिळाले चक्क दोन डबे'; नितीन गडकरी मदतीसाठी धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 16:22 IST

Nitin Gadkari : पुण्याच्या बालेवाडी मैदानावर १३ ते १५ मार्च या कालावधीत शाळकरी दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिव्यांग खेळाडूंचा प्रवास होणार निर्विघ्नकेवळ आरक्षण मागितले असताना हाती पडले ते चक्क भारतीय रेल्वेच्या पूर्ण दोन डब्यांचे ‘बुकिंग’च. नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळकरी खेळाडूंसाठी ही बाब एक वेगळाच सुखद अनुभव देणारी ठरली.

नागपूर : पुण्यात जाऊन स्वत:चे कर्तुत्व सिद्ध करण्याची जिद्द तर होती, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याची अडचण सतावत होती. कुठल्याही स्थितीत रेल्वेत बसण्यापुरती तरी जागा मिळावी ही अपेक्षा होती. इकडे तिकडे प्रयत्न करुन झाल्यावर त्यांनी अखेर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच गाठले अन् अडचण सांगितली. त्यांची जिद्द, डोळ्यातील चमक पाहून गडकरीदेखील प्रभावित झाले अन् एक संकल्पच घेतला. 

अवघ्या चार दिवसांत सर्वांच्या कानावर बातमी आली अन् आश्चर्याचा धक्काच बसला. केवळ आरक्षण मागितले असताना हाती पडले ते चक्क भारतीय रेल्वेच्या पूर्ण दोन डब्यांचे ‘बुकिंग’च. नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळकरी खेळाडूंसाठी ही बाब एक वेगळाच सुखद अनुभव देणारी ठरली. आजवर मंत्र्यांना केवळ आश्वासन देताना पाहिले होते. परंतु मागितल्यापेक्षा अधिक सुविधा देणारे गडकरी हे सर्वांहून वेगळेच आहे, अशी भावनाच या खेळाडूंच्या तोंडून बाहेर पडली.

पुण्याच्या बालेवाडी मैदानावर १३ ते १५ मार्च या कालावधीत शाळकरी दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांतील १४८ विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. पुण्याचा प्रवास हा १५ तासांहून अधिक असल्याने या खेळाडूंना रेल्वेगाडीत आरक्षण देण्यात यावे, यासंदर्भात जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे व महाराष्ट्र राज्य दिव्यांग शाळेचे अध्यक्ष रमेश भंडारी यांनी नितीन गडकरी यांना भेटून निवेदन दिले. 

गडकरी यांनी नेमकी परिस्थिती लक्षात आली व त्यांनी तत्काळ पुढाकार घेत थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाच पत्र लिहीले. या खेळाडूंना आरक्षण आवश्यक असून त्यांच्यासाठी दोन डबेच ‘बुक’ करावे असे त्या पत्रात नमूद होते. शिवाय विद्यार्थी हे दिव्यांग असून गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात ‘बुकिंग’ व्हावे अशी विनंतीदेखील त्यांनी केली. 

गडकरींचे पत्र मिळताच रेल्वेमंत्र्यांनीदेखील याची तातडीने दखल घेतली व मध्य रेल्वेला त्यासंबंधातील निर्देश दिले. १२ मार्च रोजी नागपूर ते पुणे व १५ मार्च रोजी पुणे ते नागपूर या मार्गावर महाराष्ट्र एक्सप्रेसला दोन अतिरिक्त डबे लावण्याचे आदेशच त्यांनी जारी केले.  यासंदर्भातील पत्र मध्य रेल्वेच्या ‘डीआरएम’लादेखील पाठविण्यात आले. 

खेळाडूंसाठी खरोखरच मोठा दिलासा दिव्यांग खेळाडू असल्याने त्यांच्यासमवेत शिक्षक तसेच ‘केअरटेकर’देखील जाणे आवश्यक होते. परंतु आवश्यक प्रमाणात आरक्षणच नसल्याने आम्ही चिंतीत झालो होतो. या खेळाडूंना बसने नेणे शक्य नव्हते. प्रवासानेच त्यांची परीक्षा घेतली असती. नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे या सर्व खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे स्पर्धेला जाण्याअगोदरच सर्व खेळाडू आनंदी झाले आहेत.- सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, नागपूर 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीrailwayरेल्वे