नागपुरात ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरची डिमांड वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 08:01 PM2020-09-08T20:01:15+5:302020-09-08T20:03:33+5:30

कोरोना रुग्णांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला शासनातर्फे देण्यात येत आहे. अशा रुग्णांची संख्या वाढत असून त्यासोबतच घरीच शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे.

Demand for oximeter, thermal scanner increases in Nagpur! | नागपुरात ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरची डिमांड वाढली!

नागपुरात ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरची डिमांड वाढली!

googlenewsNext
ठळक मुद्देप्रादुर्भाव वाढल्याने काळजीवर भर : कंपनीनुसार वेगवेगळ्या किमती, सहज उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला शासनातर्फे देण्यात येत आहे. अशा रुग्णांची संख्या वाढत असून त्यासोबतच घरीच शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे. कोरोनापूर्वी १० ते २० च्या संख्येत विकणारे ऑक्सिमीटर आता तुलनात्मरीत्या ४०० पेक्षा जास्त विकले जात आहेत. लोकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता वाढल्याने या उपकरणांची विक्री वाढल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णाव्यतिरिक्त कोरोना नसलेले लोकही घरी तापमान आणि ऑक्सिजन स्तर मोजण्यासाठी या दोन्ही उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. आता लोकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता वाढली आहे. सध्या थर्मल स्कॅनरची विक्री कमी झाली, पण ऑक्सिमीटरची विक्री जवळपास दहा पटीने वाढली आहे. लोक आता खिशातच ऑक्सिमीटर घेऊन चालत आहेत. प्रत्येक घरात ही उपकरणे आता जीवनाचे अंग बनले आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात थर्मल स्कॅलरची मागणी वाढली होती. बाजारात उपलब्धता नसल्याने या उपकरणाची ८ हजार रुपयांपर्यंत विक्री झाली होती. पण आता हेच उपकरण कंपनीनुसार १००० ते १४०० रुपयांत बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहेत. याशिवाय सहज उपलब्ध असलेले ऑक्सिमीटर ५०० ते २५०० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. मागणीपेक्षा जास्त स्टॉक मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. पूर्वीच्या तुलनेत कमी किमतीत मास्क आणि सॅनिटायझरही लोकांना मिळत आहे. आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांतर्फे घेण्यात येत असलेल्या औषधीचा किती फायदा होत आहे, हे ऑक्सिमीटरवरून कळते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

फार्मा आणि नॉन-फार्मा दुकानात उपलब्ध
ही दोन्ही उपकरणे फार्मासह नॉन फार्मा दुकानांमध्येही विक्रीस आहेत. शहरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्येही सहजरीत्या मिळत आहेत. उपलब्धता वाढल्याने या उपकरणांच्या किमती कमी झाल्या आहेत. पूर्वी ही उपकरणे चीनमधून आयात व्हायची, पण आता भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. यावर गॅरंटी आणि वॉरंटीही देण्यात येत आहे. त्यामुळे वाढत्या किमतीवरही आळा बसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

जागरूकतेने उपकरणांची मागणी वाढली
कोरोना महामारीनंतर लोक आरोग्याप्रति जागरूक झाले असून होम आयसोलेशन असलेले रुग्ण घरीच शरीराचे तापमान आणि आॅक्सिजन स्तर मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनर खरेदी करीत आहे. पूर्वीच्या तुलनेत दोन्ही उपकरणे बाजारात किफायत किमतीत सहजरीत्या उपलब्ध आहेत. लोकांना परवडणारे आहेत. सध्या नागपूर जिल्ह्यात ऑक्सिमीटरची दररोज ४०० पेक्षा जास्त संख्येत विक्री होत आहे. तुलनात्मरीत्या थर्मल स्कॅनरची विक्री कमी झाली आहे. सामान्य लोकांमध्ये आरोग्य तपासणीची जणू स्पर्धाच लागली आहे.
हेतल ठक्कर, सचिव, नागपूर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन.

Web Title: Demand for oximeter, thermal scanner increases in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.