उप्पलवाडी आरयूबी बांधकाम सुरू असतानाच नव्या मार्गाच्या मागणीला जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:14+5:302021-01-13T04:17:14+5:30
नागपूर : कामठी रोडवर उप्पलवाडी येथे उभारल्या जात असलेल्या आरयूबीच्या दुसऱ्या भागाच्या बांधकामादरम्यान जवळच असलेल्या मांडवा या गावापर्यंत ...

उप्पलवाडी आरयूबी बांधकाम सुरू असतानाच नव्या मार्गाच्या मागणीला जोर
नागपूर : कामठी रोडवर उप्पलवाडी येथे उभारल्या जात असलेल्या आरयूबीच्या दुसऱ्या भागाच्या बांधकामादरम्यान जवळच असलेल्या मांडवा या गावापर्यंत मार्ग तयार करून देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, आरयूबीच्या पहिल्या भागाचे बांधकाम होत असताना ही मागणी झाली नाही. मात्र, ते काम पूर्ण झाल्यावर आता ही मागणी पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोणत्याही निश्चित झालेल्या प्रकल्पामध्ये अचानकपणे एखाद्या वस्तीपर्यंत मार्ग बांधून देण्याची मागणी पुढे यावी, ही बाब चर्चेची ठरली आहे. आधीच विलंबाने सुरू असलेल्या कामात आता दुसरा काँक्रीट बॉक्सही रेल्वे ट्रॅकच्या खाली ढकलण्यात आला आहे. आता फक्त काँक्रीटीकरणाचे काम बाकी आहे. या कामासोबतच उप्पलवाडीच्या दुसऱ्या आरयूबीपासूनही १५ दिवसांत वाहतूक सुरू होणार आहे. एनएचएआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते कामठी दरम्यानच्या उप्पलवाडी आरयूबीच्या डाव्या बाजूला असलेल्या रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या या वस्तीमधून ही मागणी पुढे आली आहे. १०० मीटरचा मार्ग ज्या ठिकाणाहून बांधण्याची मागणी होत आहे, ती जागा रेल्वेच्या मालकीची आहे.
लॉकडाऊनच्या काळात आरयूबी बांधकाम पूर्ण करण्यासाठी वॉटर लाईन शटडाऊन करण्याची मागणी करण्यात आली होती. ते उन्हाळ्याचे दिवस असल्याने मनपने या कामाला परवानगी दिली नव्हती. यानंतर पाईप लाईन शिफ्टिंगच्या कामातही बराच विलंब झाला होता. २०१८ मध्ये सुरू झालेले हे आरयूबीचे बांधकाम मे २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, हे उल्लेखनिय !