शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

चार लाखांच्या बदल्यात ५९ लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:22 IST

चार लाख रुपयांच्या बदल्यात ६ लाख १८ हजार रुपये घेतल्यानंतर आणखी ५३ लाख रुपये वसूल करण्यासाठी अवैध सावकारांनी एका बेकरी व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची जमीन हडपली. आता त्यांचे घर बळकावण्याचे प्रयत्न चालविल्याची संतापजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रभुदास मावजीभाई पटेल (रा. आंबेडकर चौक, लकडगंज) आणि अनिल भाईलाल पटेल (रा. माधव अपार्टमेंट, लकडगंज) या दोन अवैध सावकारांविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसहा लाख वसूल केले : ३० लाखांचा भूखंडही बळकावला : अवैध सावकारांची भाईगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार लाख रुपयांच्या बदल्यात ६ लाख १८ हजार रुपये घेतल्यानंतर आणखी ५३ लाख रुपये वसूल करण्यासाठी अवैध सावकारांनी एका बेकरी व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची जमीन हडपली. आता त्यांचे घर बळकावण्याचे प्रयत्न चालविल्याची संतापजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रभुदास मावजीभाई पटेल (रा. आंबेडकर चौक, लकडगंज) आणि अनिल भाईलाल पटेल (रा. माधव अपार्टमेंट, लकडगंज) या दोन अवैध सावकारांविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.हुडकेश्वरमधील सुदर्शननगरात राहणारे जियाउल्ला अफजल हुसेन सिद्दीकी (वय ४९) यांची १० वर्षांपूर्वी बेकरी होती. बेकरी व्यवसाय मोठा करण्यासाठी त्यांनी पटेल जोडगोळीकडून १९ जानेवारी २००८ ला चार लाख रुपये व्याजाने घेतले. कर्जखत तयार करण्याच्या बहाण्याने आरोपींनी ९ डिसेंबर २००९ ला सिद्दीकी यांच्या भूखंडांचे इंग्रजीत (जी भाषा सिद्दीकींना समजत नाही) आममुख्त्यारपत्र बनवून घेतले. त्याआधारे ३० लाख रुपयांचा सिद्दीकींचा भूखंड आरोपी अनिल पटेलने आपल्या नावे करून घेतला. त्यानंतरही आरोपींनी २०१४ पर्यंत सिद्दीकी यांच्याकडून ६ लाख १८ हजार रुपये वसूल केले. दरम्यान, आपल्या भूखंडाची कागदपत्रे सिद्दीकी यांनी परत मागितली असता, आरोपींनी त्यांना आणखी ५३ लाख रुपयांची मागणी केली. व्याजाचा हिशेब लक्षात आला नसल्यामुळे सिद्दीकींनी पटेलांना रक्कम देण्यास नकार दिला असता आरोपींनी १३ एप्रिल २०१८ ला सिद्दीकींच्या राहत्या घरावर तीन गुंड पाठविले. त्यांनी सिद्दीकींच्या घराची भिंत पाडून रक्कम दे अन्यथा घर खाली कर, असे म्हणत धमकी दिली. या प्रकरणाची तक्रार हुडकेश्वर ठाण्यात नोंदविण्यास गेलेल्या सिद्दीकी यांना त्यावेळी पोलिसांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.एकाला अटक, दुसरा फरारहतबल झालेल्या सिद्दीकी यांनी हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने आणि पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांची भेट घेतली. त्यानंतर तपासाची चके्र फिरली. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे चौकशी करून शुक्रवारी रात्री हुडकेश्वर ठाण्यात पटेल जोडगोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभुदास पटेलला रात्रीच अटक करण्यात आली. आरोपी अनिल पटेल फरार असून, तो गुजरातमध्ये गेला असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :MONEYपैसाnagpurनागपूर