'दिल्लीतील हवा खराब, देशाची राजधानी नागपूरला करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 08:26 PM2017-11-17T20:26:58+5:302017-11-17T21:54:31+5:30

दिल्लीतील हवा खराब आहे, त्यामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा असा सल्ला अध्यत्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी नागपूरात दिला आहे.

'Delhi's air is bad, country's capital to Nagpur' | 'दिल्लीतील हवा खराब, देशाची राजधानी नागपूरला करा'

'दिल्लीतील हवा खराब, देशाची राजधानी नागपूरला करा'

googlenewsNext

नागपूर - दिल्लीतील हवा खराब आहे, त्यामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा असा सल्ला आध्यत्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी नागपूरात दिला आहे. एका कार्यक्रमासाठी ते आज नागपुरात आलेले आहेत. अयोध्या मुद्यावर श्री श्री रविशंकर उद्या (शनिवारी) सरसंघचालकांची भेट घेणार आहेत.  

नागपूरला का राजधानी बनवलं जाऊ नये? नागपूर देशाच्या बरोबर मध्यभागी आहे. सर्वांना येण्या-जाण्याला बरं पडेल. आधीही विचार झाला होता. आता तर आपले पंतप्रधान डायनॅमिक आहेत. ते करु शकतात, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. त्याचसोबत, नागपूरच नाही, तर नागपूरच्या बाजूलाही चालेल. एका नव्या पद्धतीने पूर्ण सृष्टी बनवावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. श्री श्री रविशंकर यांच्या वक्तव्यानंतर अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र श्री श्री रविशंकर यांना राजकीय नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सद्यस्थितीत रामजन्मभूमीचा वाद सर्वोच्च न्यायालयात असून सौहार्दपूर्ण पद्धतीने तोडगा निघावा यासाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी व धर्मगुरूंशी भेट घेऊन चर्चा केली. मात्र रविशंकर यांनी मध्यस्थीच्या दाखवलेल्या तयारीला आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि विश्व हिंदू परिषदेनेही विरोध केलेला आहे. असवुद्दीन ओवैसी, आजम खान यासारख्या मुस्लिम नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. इतकेच काय तर हिंदुत्ववादी संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या प्रयत्नांना विरोध झाला. भाजपचे माजी खासदार राम विलास वेदांती यांनी रविशंकर यांच्यावर मोठा प्रश्नच उपस्थित केला. रविशंकर यांनी गोळा केलेल्या अमाप संपत्तीची चौकशी होऊ नये यासाठीच त्यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप वेदांती यांनी केला. या वादात मध्यस्थी करणारे रविशंकर कोण आहेत, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर रविशंकर यांनी शुक्रवारी लखनौ येथे ‘आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते थेट नागपूरला आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर ते शनिवारी सरसंघचालकांची भेट घेणार आहेत. संघ परिवारातील काही संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या मध्यस्थीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सरसंघचालकांसोबतच्या त्यांच्या भेटीला जास्त महत्त्व आले आहे. या भेटीमध्ये राममंदिर मुद्याचा तोडगा निघावा यासाठी नेमकी काय पावले उचलली पाहिजे, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मी सकारात्मक : श्री श्री रविशंकर
दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्री श्री रविशंकर अयोध्या राममंदिर मुद्याबाबत मी सकारात्मक असल्याचे सांगितले. रामजन्मभूमी वाद हा चर्चेतून सोडविल्या जाऊ शकतो. याचा तोडगा निघेल असा मला विश्वास आहे. हा वाद लवकरात लवकर दूर व्हावा, अशी माझी इच्छा असून मी सकारात्मक पद्धतीनेच याकडे पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: 'Delhi's air is bad, country's capital to Nagpur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर