लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यू म्हाळगीनगर येथील बेसा पॉवर हाऊ सच्या मागील बाजूच्या नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविताना मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास एका ५५ वर्षीय झोपडपट्टीधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अफजल खान असे मृताचे नाव आहे. न्यू म्हाळगीनगर येथे नाल्याच्या काठावर नासुप्रची मोकळी जागा आहे. या जागेवर काही वर्षापूर्वी झोपडपट्टी वसली होती. यात अफजल खान गेल्या पाच वर्षापासून झोपडी उभारून राहात होते. दरम्यान ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली. महापालिका या जागेवर वॉकिंग स्ट्रीट निर्माण करणार आहे. यासाठी हनुमाननगर झोन कार्यालयाने झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतरही झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण काढले नाही. झोन कार्यालयाने २०१७ मध्ये कोणतीही कारवाई न झाल्याने झोपड्या कायम होत्या. सोमवारी झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण काढणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी महापौरांची भेट घेऊ न १५ दिवसाची मुदत मागितली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी हनुमाननगर झोनचे पथक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यासाठी पोहचले.अफजल खान व येथील झोपडपट्टीधारकांनी सामान हटविण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली होती. परंतु अधिकाºयांनी मागणी धुडकावली. जेसीबीच्या साहाय्याने खान यांची झोपडी हटविण्याला सुरुवात केली. या दरम्यान अफजल खान यांच्या छातीत दुखायला लागले व ते जमिनीवर पडले. त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्थानिक नागरिक व कुटुंबीय अफजल खान यांचे पार्थिव घेऊ न वस्तीत परतले.महापौरांकडे १५ दिवसाची मुदत मागितली होती. त्यानंतरही राजकीय दबावात अतिक्रमण कारवाई करण्यात आल्याचा आरोप करीत नागरिकांनी गोंधळ घातला. यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तातडीने घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
नागपुरात अतिक्रमण हटविताना झोपडपट्टीधारकाचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:15 IST
न्यू म्हाळगीनगर येथील बेसा पॉवर हाऊ सच्या मागील बाजूच्या नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविताना मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास एका ५५ वर्षीय झोपडपट्टीधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नागपुरात अतिक्रमण हटविताना झोपडपट्टीधारकाचा हृदयविकाराने मृत्यू
ठळक मुद्देअतिक्रमण हटविताना घडली घटना: न्यू म्हाळगीनगर येथे तणाव