संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 10:37 IST2020-01-18T10:36:54+5:302020-01-18T10:37:16+5:30
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे नागपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपुरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे नागपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. शनिवार १८ जानेवारी रोजी दुपारी त्यांचे दिल्ली येथून ३.४५ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. विमानतळावरून ते दुपारी ४.१५ वाजता अंबाझरी येथील आयुध निर्माण कारखान्याला भेट देतील. सायंकाळी ७.३० वाजता अंबाझरी येथील आयुध निर्माण कारखाना येथून व्ही. सी. ए. जामठाकडे प्रयाण करतील. स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून रात्री ८.४५ वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.