शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मेयोतही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘दीनदयाल थाळी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:27 IST

श्री सालासर सेवा समितीच्यावतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘पं. दीनदयाल थाळी’ उपक्रमाचे लोकार्पण रविवार १८ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमातून रोज ८०० जणांना केवळ १० रुपये सेवाशुल्कात भोजन उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती सालासर सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम सारडा यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देआज लोकार्पण : रोज ८०० लोकांची भूक शमविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री सालासर सेवा समितीच्यावतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘पं. दीनदयाल थाळी’ उपक्रमाचे लोकार्पण रविवार १८ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमातून रोज ८०० जणांना केवळ १० रुपये सेवाशुल्कात भोजन उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती सालासर सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम सारडा यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, सालासर सेवा समितीचे सचिव मांगीलाल बजाज, कोषाध्यक्ष वासुदेव मालू, सहसचिव घाशीराम मालू आदी उपस्थित होते.मांगीलाल बजाज म्हणाले, मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्स समोरील जागा समितीला भोजन वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात एकाचवेळी १२५ रुग्णांचे नातेवाईक भोजन करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या दोन नातेवाईकांना ‘पं. दीनदयाल थाळी’चे कूपन दिले जाईल. सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ वाजेपासून ते रात्री ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत अशा दोन वेळेत भोजन दिले जाईल. दोन्ही वेळच्या भोजनात पोळी, भाजी, भात, वरण, लोणचे असेल. विशेष म्हणजे, नातेवाईकांना पोटभर जेवण दिले जाईल. यांच्या सेवेत २५ कार्यकर्ते राहतील, असेही ते म्हणाले.-पुढील तीन महिन्यात मेयोचे पाकगृहही अद्ययावतअधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी एका प्रश्नाचा उत्तरात म्हटले, मेयोची रुग्ण संख्या ५९० वरून वाढून ८०० वर पोहचली आहे. यामुळे जुने पाकगृह अपुरे पडत आहे. जुन्या वॉर्ड क्रमांक १२ ला अद्ययावत पाकगृहाचे स्वरुप देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील तीन महिन्यात रुग्णाच्या सेवेत हे पाकगृह असेल.

टॅग्स :foodअन्नhospitalहॉस्पिटल