चाचण्या वाढल्या रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:27+5:302020-12-15T04:26:27+5:30

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाबाबत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी चाचण्यांची संख्या पाच हजारावर गेली असताना रुग्णांच्या संख्येत घट ...

Decreased number of patients undergoing tests | चाचण्या वाढल्या रुग्णसंख्येत घट

चाचण्या वाढल्या रुग्णसंख्येत घट

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाबाबत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी चाचण्यांची संख्या पाच हजारावर गेली असताना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली. आज २८२ नवे रुग्ण व ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १,१७,४९३ झाली असून, मृतांची संख्या ३,८०४ वर पोहचली. नव्या रुग्णांच्या तुलनेत अधिक रुग्ण, ३१८ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,०७,९५० झाली.

नागपूर जिल्ह्यात बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत. परिणामी, कोरोनाविषयी पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. आज ४,११२ आरटीपीसीआर तर, १,१२९ रॅपिड ॲन्टिजेन मिळून ५,२४१ चाचण्या झाल्या. मागील चार दिवसाच्या तुलनेत चाचण्या वाढल्या असल्या तरी बाधितांचा संख्येत वाढ झाली नाही. शहरात २१२, ग्रामीणमध्ये ६७ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृतांमध्ये शहरात ३, ग्रामीणमध्ये १ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ५,७३९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, यातील १,३५५ रुग्ण विविध रुग्णालयात भरती आहेत. ४,३८४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

-४,९५९ चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह

आज तपासण्यात आलेल्या ५,२४१ मधून ४,९५९ संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. एम्सच्या प्रयोगशाळेत तपासलेल्या ४२५ चाचण्यातून ३७३, मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासलेल्या ७०६ चाचण्यातून ६३७, मेयोच्या प्रयोगशाळेत तपासलेल्या ३७४ चाचण्यातून ३५०, माफसूच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ९८ चाचण्यातून ८७, नीरीच्या प्रयोगशाळेत तपासलेल्या १०७ चाचण्यातून ७९, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासलेल्या ३१४ चाचण्यातून २८३ तर खासगी लॅबमध्ये तपासण्यात आलेल्या २,०८८ चाचण्यातून २,०२५ चाचण्या निगेटिव्ह आल्या. ॲन्टिजेन चाचणीतील १,१०५ संशयितांचा अहवालही निगेटिव्ह आला.

- दैनिक संशयित : ५,२४१

- बाधित रुग्ण : १,१७,४९३

_- बरे झालेले : १,०७,९५०

- उपचार घेत असलेले रुग्ण : ५,७३९

- मृत्यू : ३,८०४

Web Title: Decreased number of patients undergoing tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.