शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:00 IST

भाजपा सरकारने राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवेगिरी असून, सरकारने दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा सरकारने राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवेगिरी असून, सरकारने दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपून गेली आहेत. राज्यात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे. अशातच सरकारने केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा फसवी आहे. महाराष्ट्रात येऊन पाहणी करून गेलेल्या केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यानंतरच दुष्काळ जाहीर करण्याची घोषणाही संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.सरकार जोपर्यंत दुष्काळ जाहीर करीत नाही तोपर्यंत खरीपातील सोयाबीन व कापसाला मदत मिळू शकत नाही. तसेच संपूर्ण राज्यात विहिरीत पाणी कमी असल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, या पिकांनाही मदत होऊ शकणार नाही. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित सवलती द्याव्यात व आर्थिक मदत करावी; अन्यथा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखdroughtदुष्काळ