शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महाबोधी महाविहार ताब्यासाठी निर्णायक क्षण, आकाश लामा यांचा दावा , दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेसला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:46 IST

बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे सर्वात पवित्र स्थान आहे.

आनंद डेकाटे, नागपूर: बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे सर्वात पवित्र स्थान आहे. हे पवित्र स्थळ १३४ वर्षांपासून बौध्दांकडे नाही. मात्र, गेल्या ११० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे फलित म्हणजे सवोंच्च न्यायालयाने तब्बल १२ वर्षानंतर याचिकेवर सुनावणी घेतली. तसेच, २९ जुलैला यासंदर्भात अंतीम सुनावणी आहे. धैर्य आणि शांती हे या आंदोलनाचे मुख्य आधार आहेत. त्यामुळे आताचे आंदोलन हे निर्णायक क्षणावर येऊन ठेपले असल्याचा दावा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते व ऑल इंडीया बुद्धिस्ट फोरमचे महासचिव आकाश लामा यांनी केला. रविवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी ते आले असता दीक्षाभूमीवर पत्रकारांशी बोलत होते. लामा यांनी दीक्षाभूमी येथे तथागत गौतम बुध्दांना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला पुष्प अर्पण करीत अभिवादन केले.

लामा म्हणाले, बौध्द टेंपल ॲक्ट १९४९ रद्द करून महाविहाराचा ताबा बौध्दांकडे असावा ही प्रमुख मागणी आहे. हेच या आंदोलनाचे मुळ आहे. आज हे आंदोलन देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर गेले आहेत. बुध्दगयेत कायद्यानुसार लढा सुरू आहे. सध्या महाविहारापासून २ किमी अंतरावर धरणे दिले जात आहे. आता पुन्हा ५ किमी दूर जात आहे. कायद्याचे शांतीपूर्ण पालन होईल. मात्र, ही सरकारने अपरीहार्यता समजू नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. २९ तारखेला निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्याही निर्णयासाठी आम्ही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आकाश लामा यांनी दीक्षाभूमीनंतर ड्रॅगन पॅलेस टेम्पललाही भेट दिली. यावेळी माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी लामा दाम्पत्यांचे स्वागत केले. यावेळी भदंत डॉ. चंद्रकीर्ती व इतर उपस्थित होते.

भंते विनयाचार्यांना तातडीने सोडण्यात यावेबुध्दगयेत भिक्खूंवर अन्याय होत आहे. भंते विनयाचार्यांना अटक झाली. त्यांना तातडीने सोडण्यात यावे. आंदोलनात फूट पाडण्यासाठी काही अंतर्गत शत्रूही तयार झाले. परंतु, बौध्दांच्या पवित्र स्थळाचा हा मुद्दा असल्याने येथे कुणाच्याही श्रेयाचा विषय नाही. हे सर्वांचे आंदोलन आहे. बुध्दगयेत नेमके काय सुरू आहे, हे देशाला कळावे यासाठी आता बाहेर पडलो आहे. दीक्षाभूमी या पवित्र स्थळापासून यास सुरूवात होत असल्याचे लामा म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र