शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोळीवाडे पुनर्विकासाचा सहा महिन्यांत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:37 IST

मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करणे आणि पुनर्विकासासंबंधी शासन सहा महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्र वारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.

नागपूर -  मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करणे आणि पुनर्विकासासंबंधी शासन सहा महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्र वारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य किरण पावसकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.पाटील म्हणाले, मुंबई शहर व मुंबई उपनगरातील कोळीवाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमांकन करण्यासाठी अनुसरावी लागणारी कार्यपद्धती आणि त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने कोळीवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल शासनास सादर केला आहे. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे व पात्र अतिक्रमणदारांचे पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांनी सादर केला आहे. हा प्रस्ताव पुढील कार्यवाही करण्याकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला अग्रेषित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.मल्होत्रा हाउस येथीलउपनिबंधक कार्यालय हलविणारमुंबईतील मल्होत्रा हाऊस येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेची इमारत मोडकळीस आली आहे. शिवाय काही ठिकाणी पडझडही झाली आहे, दुर्घटना टाळण्यासाठी हे कार्यालय त्वरित पर्यायी जागेत हलविण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. सदस्य अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी ही लक्षवेधी मांडली होती.देशमुख म्हणाले, मल्होत्रा हाऊसला भेट देऊन इमारतीची पाहणी केली आहे. इमारत मालकाला दुरुस्तीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे, पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता शासन घेत आहे.रायगडचा प्रलंबित निधी मिळणाररायगड जिल्ह्याला गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेला खनिज विकास निधी उपलब्ध करण्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता.जिल्ह्याच्या महसुलाच्या प्रमाणात विकास निधी संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने रायगड जिल्ह्यातील विकास कामे रखडल्याचे तटकरे यांनी निदर्शनास आणले. खरवली, सुरव, मोरवा या रस्त्यासाठी मंजूर १८ लाख रुपयांचा निधी कधी उपलब्ध करणार असा सवाल त्यांनी केला. निधीसंदर्भात पालकमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांच्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार