शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

‘अ‍ॅट्रॉसिटी’बाबतचा निर्णय पूर्वग्रह दूषित ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:15 IST

अ‍ॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाबाबत न्यायाधीशांनी जी निरीक्षणे नोंदवलेली आहेत, ती लक्षात घेता न्यायालयाचा हा निर्णय पूर्वग्रहदूषित तर नाही ना? जातीय मानसिकतेतून तर हा निर्णय देण्यात आलेला नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. तेव्हा हा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांची चौकशी व्हावी, अशी मागणी संविधानाचे अभ्यासक प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी येथे केली.

ठळक मुद्देदेवीदास घोडेस्वार : ‘त्या’ न्यायाधीशांची व्हावी चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अ‍ॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाबाबत न्यायाधीशांनी जी निरीक्षणे नोंदवलेली आहेत, ती लक्षात घेता न्यायालयाचा हा निर्णय पूर्वग्रहदूषित तर नाही ना? जातीय मानसिकतेतून तर हा निर्णय देण्यात आलेला नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. तेव्हा हा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांची चौकशी व्हावी, अशी मागणी संविधानाचे अभ्यासक प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी येथे केली.‘ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याची उपयोगिता संपणार का? या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स (बानाई) नागपूरतर्फे शुक्रवारी सायंकाळी बानाईच्या डॉ. आंबेडकर सभागृह उर्वेला कॉलनी येथे परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बानाईचे अध्यक्ष डॉ. एस.के. तलवारे होते. तर अ‍ॅड. शैलेश नारनवरे, अ‍ॅड. नितीन मेश्राम, अ‍ॅड. स्मिता कांबळे प्रमुख वक्ते होते.प्रा. देवीदास घोडेस्वार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय कायम राहिला. त्यात पार्लमेंटने हस्तक्षेप करून नवीन कायदा तयार केला नाही, तर या कायद्याचे अस्तित्वच संपेल. कायदा केवळ कागदावरच शिल्लक राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.प्रास्ताविक मनोज रामटेके यांनी केले. शिल्पा गणवीर यांनी संचालन केले.बॉक्स..हे तर ‘ज्युडिशियल टेररिजम’अ‍ॅड. शैलेश नारनवरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे ज्युडिशियल टेररिजम होय. हे अधिक घातक आहे. या निर्णयामुळे लाखो, करोडो दलित, आदिवासींवर अन्याय झाला आहे. पुनर्विचार याचिका दाखल केली तरी फारसा फरक पडणार नाही. कारण न्यायालयात त्याच मानसिकतेचे व तेच न्यायाधीश आहेत. तेव्हा संसदेनेच पुढाकर घेऊन नवीन कायदा करावा. त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.- आंबेडकरवाद्यांनी आतान्यायालयावरच मोर्चे काढावेअ‍ॅड. नितीन मेश्राम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे संविधानाशी फ्रॉड आहे. हा निर्णय जातीय मानसिकतेतून तर देण्यात आलेला आहे म्हणून निर्णय देणाºया न्यायाधीशांची नार्को टेस्ट करण्यात यावी. न्यायाधीश जातीयवादी आहेत, हे म्हणण्याचे अधिकार आम्हाला असावे, असे स्पष्ट करीत विधानसभा व संसदेवर खूप मोर्चे निघाले आता आंबेडकरवाद्यांनी न्यायालयावरच मोर्चे काढावे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर