शांतिवन चिचोलीतील ६ डिसेंबरची अभिवादन सभा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:19 IST2020-12-03T04:19:11+5:302020-12-03T04:19:11+5:30

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांतिवन चिचोली येथे दरवर्षी अभिवादन सभा आयोजित केली जाते. या सभेला ...

December 6 greeting meeting at Shantivan Chicholi canceled | शांतिवन चिचोलीतील ६ डिसेंबरची अभिवादन सभा रद्द

शांतिवन चिचोलीतील ६ डिसेंबरची अभिवादन सभा रद्द

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांतिवन चिचोली येथे दरवर्षी अभिवादन सभा आयोजित केली जाते. या सभेला हजारो लोकांची उपस्थिती असते. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन येत्या ६ डिसेंबर रोजी होणारी अभिवादन सभा रद्द करण्यात आली असल्याचे शांतिवन चिचोलीचे कार्यवाहक संजय पाटील यांनी कळविले आहे.

भारतीय बौद्ध परिषदेतर्फे महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी शांतिवन चिचोली येथे अभिवादन सभा आयोजित केली जाते. या दिवशी होणारी गर्दी व कोविड-१९ चा वाढता संसर्ग लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याने यंदाचा जाहीर अभिवादनाचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. या दिवशी कुठलाही जाहीर कार्यक्रम होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: December 6 greeting meeting at Shantivan Chicholi canceled