शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

एक लाखावर शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 1:20 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकºयांना सन्मानाने कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा झाला आहे.

ठळक मुद्दे८३५ कोटी ५५ लाखाचा लाभ : पात्र शेतकºयांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकºयांना सन्मानाने कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५ हजार १७७ लाभार्थी शेतकºयांना पात्रतेच्या निकषानुसार लाभ मिळणार असून, सुमारे ८३५ कोटी ५५ लक्ष रुपयांची याअंतर्गत कर्जमाफी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.या महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक कर्जमाफी योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण तसेच कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांचा सत्कार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. डॉ. मिलिंद माने तसेच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.कर्जमुक्त शेतकºयांची नावेनागपूर ग्रामीण : अजय दादाराव ढोले बोरगाव यांचे (९०,८०६), गोविंदा नामदेव वानखेडे येरला (९३३४९) रुपये, कामठी तालुका- किरण दिनेश भारती पावनगाव (२२,४१०) रुपये, बाबा भगवान रासेकर नांदा (२८,४५३) रुपये, हिंगणा तालुका-नत्थुजी नारायण घरत मु. सावंगी देवळी (१,१८,६२८), मनोहर पांडुरंग मानकर सालई मेंढा (१,१७,८०८), कळमेश्वर तालुका- तुळशीराम शंकरराव पांडेकर कोहळी (१,३५,४७८), मधुकर नीळकंठराव मानकर दहेगाव (१,३८,६७९), नरखेड तालुका- रामराव उकंडराव पांडे बानोर (१,०४,३२९), श्रीमती रेणुकाबाई अरुण गावंडे मोगरा (७३,७६७), सावनेर तालुका- संजय रामचंद्र केणे इटनगोटी (७७,९४९), विलास विठ्ठलराव राऊत पाटणसावंगी (१,०६,२०६), पारशिवनी तालुका- धनराज पांडे वराडा (३५,३६७), उत्तम शेषराव ठाकरे केरडी (६०,९२६), रामटेक तालुका- होमराज नामदेव आष्टनकर बोजापूर (३२,३८८), हिरामण श्रीराम हिंगे मानापूर (७५,१६७), मौदा तालुका- पुजाराम दशरथ फुकट माथनी (४५,९६८), मोरेश्वर कोठीराम डांगरे मांगलीतेली. कुही तालुका- सहादेव रामा मरघडे सिल्ली (५९,२५१), युवराज नागोजी वैद्य सिल्ली (७६,७०९), उमरेड तालुका- अंकुश रामाजी सराटे बोरगाव कलांद्री (६७,७३३), केशव शंकर बानाईत बोरगाव कलांद्री (१,४०,६८०), भिवापूर तालुका- पंढरी तुकाराम वैरागडे कोलारी (१,२९,८४९), संतोष तुकाराम शेळके भागेबोरी (१,३०,२९५).\दिलासा मिळाला, शेतकºयांच्या प्रतिक्रियामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना कर्जमाफीची योजना जाहीर केली आणि दिवाळीपूर्वीच प्रत्यक्ष अंमलबजावणी करून मोठा दिलासा दिला आहे. कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे नवीन कर्ज मिळत नव्हते. परंतु कर्जमाफी मिळाल्यामुळे सातबारा कोरा झाला आणि आता नवीन कर्जही मिळणार आहे. त्यामुळे नव्या उमेदीने शेती पिकविणार असल्याचा विश्वास कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांनी व्यक्त केला.