संकटातील शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या
By Admin | Updated: June 19, 2016 02:57 IST2016-06-19T02:57:49+5:302016-06-19T02:57:49+5:30
राज्यातील शेतकरी हा संकटात सापडला असून, विविध समस्यांचा सामना करीत आहे. अशा स्थितीत त्याला आधाराची गरज आहे.

संकटातील शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या
आम आदमी पार्टीचा धडक मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर : राज्यातील शेतकरी हा संकटात सापडला असून, विविध समस्यांचा सामना करीत आहे. अशा स्थितीत त्याला आधाराची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, प्रत्येकाला पुन्हा पीक कर्ज उपलब्ध द्या, अशा मागणीसह शनिवारी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आम आदमी पार्टीच्या सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयातून हा मोर्चा काढण्यात आला होता. परंतु पोलीस प्रशासनातर्फे या मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे तो मोर्चा सिव्हिल लाईन्स परिसरातील मीठा निम दर्गा येथेच समाप्त करण्यात आला. दरम्यान आम आदमी पार्टीचे नेते सुभाष वारे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्या, बियाणे व खताचा काळाबाजार थांबवा, सातवा वेतन आयोग लागू करण्याअगोदर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशा मागण्यांकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यात आले. या मोर्चात संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. तसेच आम आदमी पार्टीचे नेते सुभाष वारे, विदर्भ संघटक डॉ. देवेंद्र वानखडे, विदर्भ सचिव जगजीत सिंग, बन्सीधर कोठीकर, अशोक मिश्रा, ईश्वर गजबे, प्रमोद लढ्ढा, सचिन शेंडे, गोरले, चंद्रशेखर, गणेश रेवतकर, सुनील दीक्षित, फझिल रशीद, प्रभाकर आवारी, सचिन पारधी, किरण वेलोर, प्रभात अग्रवाल, सत्विंदर सिंग, संजय जीवतोडे, सोनू ठाकूर, कविता सिंघल, शालिनी अरोरा, शंकर इंगोले, पीयूष आकरे, रजनी शुक्ला, मन्सूर शेख, वसंत घाटीबांधे, प्रशांत इलमे, राकेश दवे, नीलेश गोयल, सुनंदा खैरकर, मनोज सोनी, वंदना मेश्राम, वीणा भोयर, संदीप सिंग, कलिम खान, अजय बन्सपाल, भूषण ढाकुलकर, एम. झेड. काझी, आरिफ दोसानी व मुन्ना तिवारी यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)