डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST2021-09-03T04:08:53+5:302021-09-03T04:08:53+5:30

कामठी : माेकळ्या जागेत साचलेल्या डबक्यातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बी.बी. ...

Death of a young man by drowning in a puddle | डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू

डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कामठी : माेकळ्या जागेत साचलेल्या डबक्यातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बी.बी. काॅलनी येथे मंगळवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

महेश उमेश सडमाके (वय २६, रा. अब्दूलशाह दरगाह, कामठी) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे भंगार गाेळा करण्याचे काम करीत हाेता. महेश हा नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास भंगार गाेळा करण्यासाठी गेला हाेता. दरम्यान, बी.बी. काॅलनी परिसरातील माेकळ्या जागेत भंगार वेचत असताना ताेल गेल्याने ताे डबक्यात पडला. त्यातच डबक्यातील खाेल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी पाेलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: Death of a young man by drowning in a puddle