विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:12 IST2021-09-04T04:12:09+5:302021-09-04T04:12:09+5:30

बुटीबाेरी : विजेच्या ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीचे काम करीत असताना जाेरात विजेचा धक्का लागला आणि त्यात कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ...

Death of a worker due to electric shock | विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

बुटीबाेरी : विजेच्या ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीचे काम करीत असताना जाेरात विजेचा धक्का लागला आणि त्यात कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर शिवारात नुकतीच घडली.

दिवाकर चंद्रभान रेवतकर, रा. ठाणेगाव, ता. कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धा असे मृताचे नाव आहे. दिवाकर सहायक लाइनमन अहमद रज्जाक याच्याकडे काम करायचा. ताे गणेशपूर परिसरातील ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम करीत असताना त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. त्याला बुटीबाेरी येथील हाॅस्पिटलमध्ये नेले असता, डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. ताे एमएसईडीएलसीचा कर्मचारी नव्हता. शिवाय, कंत्राटदाराकडे कंत्राटी कामगार म्हणूनही काम करीत नव्हता. अहमद रज्जाक याने त्याला सुरक्षेच्या दृष्टीने काेणतीही साधने पुरविली नाहीत. या बाबी तपासात स्पष्ट हाेतात. एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी अहमद रज्जाकविरुद्ध सदाेष मनुष्यवधाचा अर्थात भादंवि ३०४ अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक पल्लवी काकडे करीत आहेत.

Web Title: Death of a worker due to electric shock