शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावरील भीषण अपघातातील मृत्यूसंख्या ७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:29 IST

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावरील वरोडा शिवारात भरधाव ट्रकने आॅटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आॅटोतील सात जणांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये चार लहान मुले, दोन महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देधार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्यांवर काळाची झडपभरधाव ट्रकने केला आॅटोरिक्षाचा चुराडामृतांमध्ये चार लहान मुले, दोन महिलाजखमींमध्ये जुळ्या भावांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावरील वरोडा शिवारात भरधाव ट्रकने आॅटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आॅटोतील सात जणांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये चार लहान मुले, दोन महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.फातिमा रफिक मोहम्मद खान (४०), आसमा परवीन मोहम्मद खान (२३), नादीर तौफिक मोहम्मद खान (दीड वर्षे), माहीम तौफिक मोहम्मद खान (अडीच वर्षे) व फज्जू शेख शकील शेख (५), सईदा बेगम नादीर शेख (६७) व डब्बू ऊर्फ मोहम्मद सयाम मोहम्मद युनूस शेख (७) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये नसरीन शेख युनूस शेख (३०), पिंकी शेख शकील शेख (२९), हसन नाजीर शेख (३०) व हुसेन नाजीर शेख (३०) या चौघांचा समावेश आहे. हसन व हुसेन हे जुळे भाऊ होत. हे सर्व नागपूर शहरातील मोठा ताजबाग, उमरेड रोड, येथील रहिवासी आहेत. मोहर्रम असल्याने ते एमएच-४९/एआर-४००७ क्रमांकाच्या आॅटोने कळमेश्वरमार्गे सावनेरकडे चाँदशहा दर्गा येथे दर्शनासाठी जात होते. दरम्यान, या मार्गावरील वरोडा शिवारात विरुद्ध दिशेने वेगात येणाºया एमएच-०४/एएल-८४२३ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या आॅटोला जोरदार धडक दिली. त्यात आॅटोतील पाच जणांचा घटनास्थळीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंत पळून गेलेल्या ट्रकचालक राजन यादव यास नंतर अटक केली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शिवाय, स्थानिक नागरिकांनी सर्व जखमींना लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था केली. त्यांना प्रथमोपचार करून नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले होते. अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान, सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

अन् ताजाबाद, नवी शुक्रवारी परिसर हळहळला

सात वर्षीय मो.सयाम मो.युनूस शेख हा मोहर्रम निमित्त धापेवाडास्थित चांदशाह वली दर्गा जाण्यासाठी उत्साहित होता. धार्मिक मान्यता पूर्ण करण्यासाठी तो आपल्या कुटुंबीयांसह धापेवाडास्थित चांदशाह वली दर्गा येथे जात होते. मात्र अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला व क्षणात होत्याचे नव्हते झाले. अपघातात जखमी झालेली त्याची आई नसरीन शेख यांना मानसिक धक्काच बसला आहे. केवळ त्याच नव्हे तर  कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा परिसरात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व सातही जणांच्या कुटुंबीयांची अशीच अवस्था आहे. हे सर्व सात जण हे नागपुरातील ताजाबाद व नवी शुक्रवारी परिसराशी संबंधित आहेत. या घटनेची माहिती कळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. धार्मिक परंपरा पूर्ण करण्यासाठी मोहर्रमसाठी सर्व लोक धापेवाडा येथे चालले होते. घरुन निघताना सर्व जण एकत्रितच निघाले. मात्र रस्त्यातच त्यांना काळाने गाठले. या घटनेत चार लहान मुलांनादेखील जीव गमवावा लागला. सर्वांच्या कुटुंबीयांना अक्षरश: मानसिक धक्का बसला होता. अनेक जण तर काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. आमच्या कुटुंबात दरवर्षी मोहर्रमच्या दिवशी चांदशाह वली दर्गा येथे जाण्याची परंपरा आहे. याची अनेक दिवसांपासू़न प्रतीक्षा होती. यावेळीदेखील सर्वजण आनंदी होते, मात्र या घटनेमुळे आम्ही उद््््््ध्वस्त झालो आहे, अशी भावना शेख अल्ताफ यांनी बोलून दाखविली. मो. सयाम मो. यूनुस शेख याच्या आईला मेयो इस्पितळाच्या वॉर्ड क्रमांक ३९ मध्ये भरती करण्यात आले आहे. मुलाच्या मृत्यूमुळे पिता युनूस शेख हेदेखील प्रचंड धक्क्यात आहेत.

मोहर्रमसाठी आले होते नागपुरातआपल्या धार्मिक व कौटुंबिक मान्यतेला पूर्ण करणयासाठी मोहम्मद तौफिक हेदेखील नागपुरात आले होते. मात्र अपघातात त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोळ्यासमोर तर अक्षरश: अंधारी आली व ते काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू