शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

नागपूरनजीक अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 8:34 PM

भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या  वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देबाजारगाव शिवारातील घटना : रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

आॅनलाईन लोकमतनागपूर : भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या  वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.या परिसरात बोर व्याघ्र प्रकल्प असून, कळमेश्वर तालुक्यातील जंगली भाग लागूनच आहे. त्यामुळे या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ व बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान, ही वाघीण सायंकाळी राष्ट्रीय  महामार्गावरील घुलीवाला पूल ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आलोकर आणि कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तिचे वय पाच ते सहा वर्षे असल्याची माहिती आलोकर यांनी दिली. याच वाघिणीने आठवडाभरापूर्वी पाचनवरी शिवारात एका गाईची शिकार केली होती. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून या घुलीवाला पुलावर वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील वर्षी याच पुलावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा व त्यापूर्वी हरणाचा मृत्यू झाला होता. या बाबी वन विभागातील अधिकाऱ्यांना माहिती असूनही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाही.

टॅग्स :TigerवाघAccidentअपघात